मावळ
हा लेख मावळ भौगोलिक प्रदेश, मावळप्रांताचा इतिहास याबद्दल आहे. मावळ तालुका प्रशासकीय विभाग यासाठी पाहा, मावळ तालुका.
मावळ हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. या तालुक्यात १२ आणि जुन्नर-शिवनेरीखाली १२ अशी एकूण २४ मावळ आहेत.जुन्नर प्रांततील 12 मावळ आणि पुणे प्रांततील 12 मावळ अशी एकूण 24 मावळ स्वराज्यात होती. दोन नद्या दरम्यानचा प्रदेशला मावळ किंवा नहेर असे म्हणतात.
भौगोलिक
- आंदर मावळ
- कानद मावळ
- कोरबारसे खोरे
- गुंजन मावळ
- नाणे मावळ
- पवन मावळ
- पौड मावळ
- मुठा खोरे
- मुसे खोरे
- रोहिड खोरे
- वळवंड खोरे
- हिरडस मावळ
इतिहास
शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळ्यांचा हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग होता. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांमधल्या खोऱ्याला "मावळ" आणि खोऱ्यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.
शिवाजी महाराजांचे मावळमधील सवंगडी
- कान्होजी जेधे
- तानाजी मालुसरे
- नेताजी पालकर
- बाजी पासलकर
- बाजीप्रभू देशपांडे
- मुरारबाजी
- हंबीरराव मोहिते
'मावळ'वरील मराठी पुस्तके
- सफर मावळची (ओंकार वर्तले)
- मावळी बोली (डॉ. वाघमारे)