माळी
माळी ही भारतात आढळून येणारी एक व्यावसायिक जात आहे. हा समाज पारंपरिकपणे मळे लावणारा किंवा मळेवाला म्हणून काम करत होता. माळी समाजात अनेक पोटजाती आहेत. माळी उत्तर भारतात, पूर्व भारतात तसेच नेपाळमध्ये, महाराष्ट्रात आणि तराई प्रदेशात आढळतात. महाराष्ट्रामध्ये माळी जात ही इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गात येते. माळी समाज हा मुखत्वे शेती करणारा कुणबी समाजाशी साम्य असलेला समाज आहे. काही ठिकाणी हा समाज बलुतेदार आहे तर काही ठिकाणी अलुतेदार आहे. सर्व माळी उपजातींचा मूळ उगम, संस्कृती, इतिहास किंवा सामाजिक स्थितीत समानता नसते. राजस्थानचा राजपूत माळी, राजपूत यांच्यातील गट आहे आणि १८९१ च्या मारवार राज्यातील जनगणना अहवालातील राजपूत उपवर्गाच्या अंतर्गत समाविष्ट होते.
उगम
क्षात्रधर्म या ग्रंथात क्षत्रिय माळी समाजाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उत्तर भारतात मालव, मोहेल, यादव, सोळंकी, चव्हाण, पवार, कविटकर, वाघेला, ही मुळे मराठा व राजपूत यांच्या कुळगोत्रातील जमात असून परकीय आक्रमणामुळे देशोधडीला लागले. अन्य प्रांतात जाऊन त्यांनी मळा किंवा शेती काम करावयास सुरुवात केली म्हणून त्यांना माळी असे संबोधण्यात येऊ लागले. त्यातून'क्षत्रिय माळी' ही माळी समाजाची पोटजात मानली जाऊ लागली. याशिवाय त्यांच्यात राजपूत माळी, सैनी माळी, माशीमाळी, काशीमाळी, जिरेमाळी, हळदी माळी आदि पोटभेद पडले. सर्व माळी क्षत्रियांचे गोत्र आणि आडनावे आणि वंश हे राजपूतांचे आणि मराठय़ाचे एक असल्याने शहाण्णव कुळात त्यांची आडनावे आहेत. क्षत्रिय माळी समाजाचे पोटभेद असे. सैनी, श्रीमाळी, वीरमाळी, करमाळी, गंधमाळी, मालव, मालो, माला, काछी, दासी, दोसी, बागवान, राऊत, तडस, सागर, आहार, अहरी, अंध, अंदी , मैना कहार, खईरा, वाघीलवाल आदि. मुस्लिम समाजातील बागवान हे पूर्वीचे माळी असल्याचे सांगण्यात येते.
मराठा माळी-मराठा माळी हे कुणबी असावेत, पुढे धंद्यावरून वेगळी जात बनली. त्यांच्यात फुलमाळी, अद्यप्रभू, अद्यशेटी, बावणे, हळदे, जिरे, काच, कडू, क्षीरसागर, लिंगायत, पदे, उंडे आदि तेरा पोटभेद आहेत. मात्र यात प्रामुख्याने फुलमाळी, हळदे, जिरे, काच माळी यांची संख्या जास्त आहे.
फुलमाळी हे फुलांचा व्यवसाय करणारे असून, त्यांनाच सावतामाळी असेही म्हणतात. या समाजातील लोक आपल्या पागोट्याला फुलांचा गुच्छा लावत नाहीत. तसेच चप्पल बुटांवर फुलांची नक्षी काढत नाहीत. जिरे माळी हे जिरे पिकवीत तर हळदे माळी हे हळद पिकवीत. त्यांना त्यानुसार पोटजातीचे नाव मिळाले असावे, असे म्हणले जाते.
फुले, फळे, भाज्या, ऊस, हळद, जिरे आदि बागायती पिके काढणे हा माळ्यांचा मुख्य व्यवसाय आहे. क्षत्रिय माळी- क्षात्रधर्म या ग्रंथात क्षत्रिय माळी समाजाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उत्तर भारतात मालव, मोहेल, यादव, सोळंकी, चव्हाण, पवार, वाघेला, ही मुळे मराठा व राजपूत यांच्या कुळगोत्रातील जमाती असून परकीय आक्रमणामुळे देशोधडीला लागले. अन्य प्रांतात जाऊन त्यांनी मळा किंवा शेती काम करावयास सुरुवात केली म्हणून त्यांना माळी असे संबोधण्यात येऊ लागले.
त्यातून 'क्षत्रिय माळी' ही माळी समाजाची पोटजात मानली जाऊ लागली. याशिवाय त्यांच्यात राजपूत माळी, सैनी माळी, माशीमाळी, काशीमाळी, जिरेमाळी, हळदी माळी आदि पोटभेद पडले. सर्व माळी क्षत्रियांचे गोत्र आणि आडनावे आणि वंश हे राजपूतांचे आणि मराठय़ाचे एक असल्याने शहाण्णव कुळात त्यांची आडनावे आहेत. क्षत्रिय माळी समाजाचे पोटभेद असे. सैनी, श्रीमाळी, वीरमाळी, करमाळी, गंधमाळी, मालव, मालो, माला, काछी, दासी, दोसी, बागवान, राऊत, तडस, सागर, आहार, अहरी, अंध, अंदी , मैना कहार, खईरा, वाघीलवाल आदि. मुस्लिम समाजातील बागवान हे पूर्वीचे माळी असल्याचे सांगण्यात येते.बहुतांश माळी समाज आज हा शेतीविषयक व्यवसाय करत आहे.
पौराणिक आख्यायिका
नवखंड पुष्कराज मध्ये भगवान ब्रम्हदेवाचे मंदिर आहे,त्या ठिकाणी महायज्ञाचे आयोजन केले होते, तेथे ३३ कोटी देव व शंकर आणि पार्वतीसुद्धा बसले होते. महादेवाने आपल्या अंगाचा मळ काढला व यज्ञात टाकला यज्ञातून तेजस्वी पुरुष निर्माण झाला. त्या पुरुषाचे तेज सूर्याप्रमाणे होते, व त्याच्या हातामध्ये पांढरे फूल होते. त्याचे तेज पाहून देवलोक घाबरले. नारद मुनींनी विचारले की हा तेजस्वी पुरुष कोण आहे ? तर भगवान ब्रह्मदेवांनी महादेवांना विचारले,की हा तेजस्वी पुरुष कोण ? तेव्हा महादेवांनी सांगितले की, माझ्या मळापासून तयार झालेला हा पुरुष सदैव हातामध्ये पांढरे फूल घेऊन माळी समाजात जन्म घेईल. तेव्हापासून माळी समाजाची उत्पत्ती झाली. माळी हा शब्द माला (संस्कृत)या शब्दापासून बनला आहे.
माळी समाजातील पोट जाती व इतिहास
महाराष्ट्रातील माळी समाज हा कोणत्याही एका शाखेच्या नसून अनेक पोटजाती आणि शाखा, पोटशाखा यांचा समावेश त्यात आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने फुलमाळी, क्षत्रिय माळी, वनमाळी, पानमाळी, डांगमाळी, हळदीमाळी, जिरेमाळी, गासेमाळी, काशी माळी, काचमाळी, कोसरे माळी, मरार माळी, पहाड माळी, लोणार माळी, पंचकळसी, चौकळशी, आगारी माळी, लिंगायत माळी आदि पोट जाती व शाखा आढळतात.
कोसरे माळी आडनावे :- वाढई, चौधरी, मोहुर्ले, शेंडे, बोरुले, ठाकरे, गाऊञे, महाडोळे, आदे, भेंडारे, सोनुले , निकुरे, निकोडे, ईत्यादि.
मराठा माळी-मराठा माळी हे कुणबी असावेत, पुढे धंद्यावरून वेगळी जात बनली. त्यांच्यात फुलमाळी, अद्यप्रभू, अद्यशेटी, बावणे, हळदे, जिरे, काच, कडू, क्षीरसागर, लिंगायत, पदे, उंडे आदि तेरा पोटभेद आहेत. मात्र यात प्रामुख्याने फुलमाळी, हळदे, जिरे, काच माळी यांची संख्या जास्त आहे. माळी समाज समानतेचा संदेश देतो आणि उच्च आणि नीच असा भेद करत नाही.
फुलमाळी हे फुलांचा व्यवसाय करणारे असून, त्यांनाच सावतामाळी असेही म्हणतात. या समाजातील लोक आपल्या पागोट्याला फुलांचा गुच्छा लावत नाहीत. तसेच चप्पल बुटांवर फुलांची नक्षी काढत नाहीत. जिरे माळी हे जिरे पिकवीत तर हळदे माळी हे हळद पिकवीत. त्यांना त्यानुसार पोटजातीचे नाव मिळाले असावे, असे म्हणले जाते. फुले, फळे, भाज्या, ऊस, हळद, जिरे आदि बागायती पिके काढणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.
क्षत्रिय माळी- क्षात्रधर्म या ग्रंथात क्षत्रिय माळी समाजाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उत्तर भारतात मालव, मोहेल, यादव, सोळंकी, चव्हाण, पवार, वाघेला, ही मुळे मराठा व राजपूत यांच्या कुळगोत्रातील जमात असून परकीय आक्रमणामुळे देशोधडीला लागले. अन्य प्रांतात जाऊन त्यांनी मळा किंवा शेती काम करावयास सुरुवात केली म्हणून त्यांना माळी असे संबोधण्यात येऊ लागले. त्यातून 'क्षत्रिय माळी' ही माळी समाजाची पोटजात मानली जाऊ लागली. याशिवाय त्यांच्यात राजपूत माळी, सैनी माळी, माशीमाळी, काशीमाळी, जिरेमाळी, हळदी माळी आदि पोटभेद पडले. सर्व माळी क्षत्रियांची गोत्रे आणि आडनावे आणि वंश हे राजपूतांचे आणि मराठय़ाचे एक असल्याने शहाण्णव कुळात त्यांची आडनावे आहेत.
क्षत्रिय माळी समाजाचे पोटभेद असे. सैनी, श्रीमाळी, वीरमाळी, करमाळी, गंधमाळी, मालव, मालो, माला, काछी, दासी, दोसी, बागवान, राऊत, तडस, सागर, आहार, अहरी, अंध, अंदी , मैना कहार, खईरा, वाघीलवाल आदि.
सैनी माळी समाज
१९३० च्या दशकात जेव्हा भारत ब्रिटिश राजवटीखाली होता, तेव्हा राजस्थानच्या क्षत्रिय माळी समुदायाने आणि इतर उत्तर भारतीय माळी लोकांनी उपनाम सैनी स्वीकारले.
माळी समाजातील प्रसिद्ध व्यक्ती
राजीव सातव
सिद्धराम म्हेत्रे
जयकुमार गोरे
रुपाली चाकणकर
अमोल कोल्हे
अतुल सावे
प्रज्ञा राजीव सातव
माळी समाजातील काही जिल्हानिहाय आडनावे
माळी समाजाची जिल्हा निहाय आडनाव यामध्ये प्रामुख्याने आढळली जाणारी नावे आहेत . माळी समाजाची वंशावळ लिहणारे भाट काही वर्षांच्या अंतराने महाराष्ट्रात येतात. आणि वंशावळ लिहितात .खालील यादीत काही आडनावे नसतील.उपलब्ध स्रोतांवरून ही नावे घेतली आहेत.
१. नाशिक : माळी,खैरे, गीते, जाधव, भुजबळ, वाघ, महाजन, सुरसे, वझरे, कोठुळे, बोराडे, पाचोरे, थोरात, राउत, तडस,तिडके, वाघ, मंडलिक, गायकवाड, काठे, वनमाळी, गांगुर्डे, भडके, मोटकरी ,नाईक, नवगिरे, जगझाप, भांबरे, हिवाळे, उबाळे, रानमाळी, गवळी, वेरुळे, रहाणे, वायकांडे, पगार, निकम, मोहन, तांबे, ताजने, बनकर, सोनवणे, शिंदे, तुपे, कांबळे, मौले, ताठे, निकम, काश्मिरे, उगले, शेवकर, गायखे, खसाळे, जेजुरकर, विधाते, खोडे, भंदुरे, शेवाळे, लोणारे, साळवे, शेरताठे, बच्छाव, पुंड, नवले, रासकर, कमोद, खैरनार, पैठणकर, चौरे, शेलार, जगताप, फरांदे, जंजाळे, वेलजाळी, एनडाइत, आहेर, बागुल, थालकर, मोकल, म्हैसे, भालेराव, फुलारे, लोखंडे, साळुंके, बटवाल, मेहेत्रे, पाटील, मालकर, निफाडे, गाडेकर, अंतरे, कुलधार, कचरे, तिसगे, धनवटे, कुटे, पुणेकर, चाफेकर, सूर्यवंशी,वाघचौरे, कमोदकर, महाजन
२ . अहमद नगर : रांधवन, जमदाडे,नाईक,तुपे, क्षित्रे, नेवसे ,अस्वर,सातव,हजारे, पर्वत शिरसाठ, काळोखे, जाधव,मालकर, बागडे, सजन, विधाते, मंडलिक, अभंग, शिंदे, नाईकवाडी, ताजने, अनप, मेहेत्रे, म्हस्के, पुंड, भरीतकर, डाके, गाडेकर, घोडेकर, बनकर, शेलार, पांढरे, गिरमे, ससाणे, बोरावके, इनामके, रासकर, शिंदे, नागरे,गाडीलकर,देंडगे,शेलार, चेडे, बोरुडे, व्यवहारे, चौरे, राउत, रसाळ, गायकवाड, कानडे, बागडे, होले, नवले, झोके, जगताप, दातरंगे, फुलमाळी ,फुलसुंदर, वाघ, बारावकर, सुडके, आगरकर, पानधडे, भुजबळ, खामकर, लोंढे, घोलप, साबळे, गोरे, मोरे, माळी, महाजन, ठाणगे, सुडके, बोरुडे, चिपाडे, लेंडकर, ताठे, धोंडे, गडालकर, गोंधळे, धाडगे, खराडे, तरटे, ताठे, उकंडे, कुलंगे, हुमे, साळुंके, जाधव, गरुडकर , खेतमाळीस, बेल्हेकर, क्षीरसागर, दळवी, ससाणे, पुंड, पडोळे, पडळकर, बोलगे, पांढरकर, खेतमाळीस, आळेकर, आनंदकर, बनसुडे, नन्नावरे, चाकणे, बढे, दरवडे, शेंडगे, लोखंडे, जांभूळकर, हिरवे, सुपेकर, कोथिम्बिरे, औटी, मोटे, जयकर, खेडकर, जाम्भे, इत्ते, मेमाणे, वऱ्हाडे, बोडखे, फरांदे, चौधरी, मुळे, कन्हेरकर, करंडे, झगडे, एटक, गरुडकर, आंबेकर, रायकर,सुरसे, गांजुरे, बहिर्याडे, पंधाडे, कांदे, खरपुडे, आखाडे, हिरे, जेजुरकर, गडगे, गुल्दगड, अनारसे, टेंभे, सूर्यवंशी, झोडगे , शेंडे, भागवत.
३. नागपूर : नेरकर, भेलकर,वहेकर,निकाजु, खोडस्कर, पाचघरे, फसाते, गोबरे, तडस, देशमुख, गायधने, वानखडे, गोरडे, बिरे, कुटे, चाल्पे, श्रीखंडे, दहीकर, पवार, चांदुरकर, कुबाडे, केवते, हजारे, लाखे, नावडे, गन्जरे, चांदोरे, बोडके, मगरे, वैद्य, चिमोटे, महाजन, उमप, उमाक, सननसे, घोळशे, आगलावे, चौधरी, परोपते, माळी, कावलकर, वाघ, कोल्हे, लांडगे, येवले, बनकर, ठेम्भारे, शेवाळे, धाकुलकर, डोंगरे, मदनकर, वाळके, फुसे, चिमोटे, केने, बर्डे, धाडसे, वाकडे, मसुरकर, राउत, जम्बुलकर, चरपे, गिर्हे, सातपुते, नारेकर, बारमासे, अलोने, मानेकर,वानखडे.
४. पुणे : गार्डे,माळी, फुले, जाधव, टिळेकर,भागवत, फुलारी, धसाडे,शेंडे, भोंग, भोंगळे, जयकर, लोणकर, रायकर, लाहवे, गिरमे, अनारसे, राऊत, भुजबळ, शिंदे, झुरंग,गरुडे, बिर्दावडे, आल्हाट, चिचाटे, डोके, बिरदवडे, केळकर, लेंडघर, धाडगे, जांबूकर, बाणेकर, गोरे, शेवकरी, आगरकर, धामधेरे, व्यवहारे, नावरे, जगताप, लडकत, पाबळ, भास्कर, हिंगणे, होले, वाये, बनकर, हजारे, लोंढे, बोराटे, बुरडे, कुडके, रासकर, खरात, बोरावके, कोद्रे, इनामके, जमदाडे, कुदाळे, पिसे, गदादे, भोगले, टिकोरे, लांडगे, भडके, यादव, नाळे, फडरे, अणेराव, लग्गड, दप्तरे, केदारी, वाडकर, दंगमाळी, गोंधळे, दळवी, आरु , ससाणे, काळे, साळुंखे, नंदे, जमदाडे, नेवासे, लोखंडे, बढे, झगडे, नवले, वाघोले, फरांदे, दुधाळ, कापरे, वडणे, वचकळ, भोंगले, पैठणकर, बोरकर, ताम्हाणे, पिंगळे, वाघ ,आदलिंग, गायकवाड, लावले, बटवाल, वाघमारे, फुलसुंदर, अभंग, वाव्हळ, कावळे, बिर्मल, करपे, बिडवाई, मंडलिक, परंडवाल, चिपाडे,गांजुरे, दुर्गाडे.
५. जालना - विधाते, देवकर, शिंगणे,टीलेकर, जईद, मोठे, काळे, खरात, घायाळ, गाढवे, बोरकर, झरेकर, शिंदे, गालाबे, चिंचाने, वाघमारे, साबळे, मगर ,खान्देभारद ,खालसे ,पवार, आंबेकर, झोरे, तिडके, केरकळ, जाधव , शिंदे, जवंजाळ , ठाकरे, पाटील , खैरे, वाघमारे, घोलप, गते, लांडगे, गोरे, शेरकर, वाघ, सपकाळ, मेहेत्रे, गिरम, राउत, पाचफुले, शेवाळे, बनकर, हरकल , गाढवे, धानुरे, वानखेडे, पौलबुद्धे,घायाळ , चौधरी, मोहिते, माळोदे,राऊत, बागवान(मुस्लिम).
६. हिंगोली- धामणे, डुकरे, भडके, कदम, सारंग, पारीस्कर, पायघन, काळे, धामणकर, गोरे, गवळी,मत्ते,ढोले, आराडे वाशिमकर,घोडके,काळे,जावळे,डाके,भोने,लाड,नागुलकर,बोराडे,काठोळे,पांगसे,वाठ,पुंड.
७.सातारा : गवळी, गोरे, अभंग, राउत, काळोखे, जाधव, तांबे, डांगरे, घनवट, बोराटे, शिंदे, भुजबळ, बनसोडे, शेंडे, बंकर, क्षीरसागर, ताटे, कोरे, धोकटे, पाटील, माळी, तोडकर, दगडे, कुदळे, ननावरे , नवले, रासकर, होवाळ ,जमदाडे, फरांदे, टिळेकर.मुंढेकर माळी.
८ .बुलढाणा : खरात, बंडे, तायडे, भरड , जाधव, घोलप, वानेरे, इरातकर, महाजन, चोपडे , राऊत , फुलझाडे , खंडागळे, गडे, इंगळे, देशमाने, सोनुने, गिर्हे, वानखडे, चावरे, उमरकर, बगाडे, निमकर्डे, खंडारे , दांडगे, शिरसागर, वावगे,राखोंडे, बोंबटकार, वावटळीकर, पैघन , पार्कीस्कर, पुंड, चंदनशिव, नागुलकर, बोऱ्हाडे, ढोरे, ढोले, भोणे, तोंपे, वानखेडे, पोपळघात, चावळे, डांगे, गवांदे, कानडे, डोईफोडे, धामणकार, बाईसकार, जवळकार, मुंढेकर माळी.,वाघमारे, आगळे, मसने, चिंचोलकार, बोराडे, तडस, लाड, वाथ.
९. जळगाव : महाजन, जाधव, पाटील, निकम, सोनावणे, बिरारी, बागुल, खैरनार, वानखेडे, बच्छाव, रोकडे, देशमुख, सूर्यवंशी, झाल्टे, गावले, अहिरराव, बाविस्कर, मुंढेकर माळी.मोरे, महाले, राउत, घोंगडे, भडांगे, चौधरी, बनकर.
१०. बीड : कोरडे, जवंजाळ, फुले, म्हेत्रे, ढगे, घोडके, यादव, नाईक, काळे, गोरे, लेंडाळ, भुंबे, गणगे, कदम, आगरकर, अंतरकर, सत्वधर, लगड, वाडे, बनकर, माळी, राउत, शिंदे, फुल्झाल्के, जाधव, धोडे, अरसुडे, डाके, मुंढेकर माळी,सिंगारे, गोर्माळी, जिरे, शिंदे, काळे, गोरे, दुधाळ, तुपे, लोखंडे, गायकवाड, धोंडे, कडू, जाधव, गवळी, गणगे, जिरे, रावसे, यादव, कुदाळे, मणेरी, धवळे, जमदाडे, वादे, शेलार,झीरमाळे.
११. धुळे : माळी, महाजन, सोनावणे, वाघ, बागुल, जाधव, सौंदाणे, खैरनार, महाले, देवरे, जगदाळे.
१२. अमरावती': : मडघे, कोरडे ,बनसोड, तडस, हाडोळे , गोंगे, कुंभारखाने, घाटोळ, बोबडे, चांदोरे, गोरडे, गोल्हर, खसाळे, पेटकर, कांडलकर,वहेकर,निकाजु कविटकर ,गणोरकर, अम्बाडकर,जावरकर, लोखंडे, काळे, चर्जन, निमकर, नानोटे, खेरडे, मेहरे, पवार, धनोकार, वांगे, भगत, कडू, भुयार, गाने, अकार्ते, बकाले, भोयर, राउत, रोठेकर, मेंधे, जेवाडे, टवलारे, जुनघरे, फुटाणे, झाडे, पोटदुखे, मुंढेकर माळी,नाथे, बेलोकार, आमले, पाटिल.
१३. यवतमाळ: : कुंभारखाने, धोबे, जावरकर, संदे, भंगे, घावडे, चिंचोरकर, चरडे, गोल्हर, नल्हे, सरडे, पोटदुखे, नाकतोडे, धनोकर.
१४. वर्धा : वाके, तीखे, काळे, गोरे, जांभळे, बोबडे, राउत, खेरडे, थेटे, मेहत्रे, खसाळे, गोंगे.
१५. सांगली : माळी, तोडकर, कोरे, शिवणकर, अडसूळ,वाघमारे, सागर, बालटे, राउत, जाधव, फुले, बनसोडे, फडथरे , पिसे, बनकर, लिंगे, लोखंडे, लांडगे,मेंढे,बरगाले,दुर्गाडे, मुंढेकर माळी,मोतुगडे,इरळे,म्हेत्रे,येवारे,खोबरे,भडके, माईनकर,मंडले,मानकर,वांडरे,चौगुले.
१६. अकोला : ढोणे, बोचरे, शेवाळकर, भुस्कुटे, धानोकर, मसने, चिंचोलकर ,नावकार,आमले, चोपड, पैघन, पार्कीस्कर, पुंड, चंदनशिव, नागुलकर, बोऱ्हाडे, ढोरे, गोंगे, ढोले, भोणे, तोंपे, वानखेडे, पायघान, पोपळ्घात, चावळे, डांगे, गवांदे, कानडे, डोईफोडे.मुंढेकर माळी, ढोकणे, मारोटकार, डवंगे, लायबर, कोंडे, गुरेकार, ढोक, पांगशे, लाड, डाफे, बुंदे, कोळमकार, मंगळे, मते, घोडे, नागोलकार, मासोदकर,
१७. औरंगाबाद : जाधव, शिँदे, भुजबळ, ढोके, वाघ, सोणवणे, कातबणे, दिलवाले, तिडके, पोयघन, ढवळे, बनकर, भालेराव, गहाळ, हाजारे, थोरात, भडके, नवले, गोरे, आंतरकर, भुमकर, काळे, ठाणगे, जेजुरकर, पवार, पुंड, पेरकर, देवकर, जावळे, धोंडे, मुंढेकर माळी,गायकवाड, वाघचौरे, गान्हार, हेकडे, तारव.
१८. वाशीम : पायघन, उमाळे, मोरे, अढाउ,सोनूने,भडके,धाडसे, मानकर, वाकेकर, बुरनासे, बोबडे, आमले, आकोलकर,मानकर, नागापुरे, वैराळे, उमाळे, व्यवहारे, डोंगरे, कळसकर, गिर्हे, देशमुख, पाटील, टेम्भारे,इंगळे, राऊत,काटोलकर, झगडे, भूस्कडे, राखोंडे, तायडे, धाकुलकर, आंबेकर, बिर्हे, काळपांडे, जाधव, सातव, इंगोले, नवलकर, नार्सिंगकार, बगाडे, बोळाखे,ढोक, वाघमारे, धर्माळे, गवळी, घाटे, जामोदकर, कथिलकर, ठोंबरे, दाते, खोडस्कर, चरपे, खडसे, मांडवकर, गोरडे, लेकुरवाळे, गांजरे, धाडसे, बम्बळकर, भोपळे, खरासे, डेहनकर, अढाऊ,वानखडे, उडाखे, मांडवगणे, चौधरी, भभूतकर, भड, खलोकार,राजनकर, कुले, चतुरकर, ढोकणे,जसापुरे, लोखंडे, चर्जन, तडस, भगत, ढोले, वाशिम्कार, चिमोटे, सदाफळे,हाडोळे,दहीकर,बनकर. सुंदरकर, बोळे,पेठकर,श्यामसुंदर,वावगे,नवले, कणेर, पोहनकर,वालोकार,खटाळे,आघाडे,आखरे, खरबडे,जठाळे,कांडलकर,मडघे,जुनघरे, मेहरे,कोरडे,झाडे,बनसोड,नाथे,टवलारे, मुंढेकर माळी,शाहाकार,कविटकर,गणोरकर,अम्बाडकर,नानोटे, निमकर,खेरडे,बेलसरे,भोगे,वाडोकर,मारोडकर, रडके,कडू,पवार,धनोकार,वांगे,सरडे,भोजने, भुयार,गणगणे,भोयर,होले,बानाईत,मेंढे.
२०. लातूर : माळी, गोरे, कटारे, खडबडे, शिन्दे, फुलसुंदर, वाघमारे, चाम्भार्गे, म्हेत्रे, फूटाने, जगताप.
२१ . कोल्हापूर : धोंडे,बत्तीसे, पवार, सूर्यवंशी, हिवरे, कर्णकर, बाचकर,मानकर, नागापुरे, वैराळे, उमाळे, व्यवहारे, डोंगरे, कळसकर, गिर्हे, देशमुख, पाटील,चौगुले, माळी, म्हेत्रे.
२२. नंदुरबार : महाजन, देवरे, माळी, मगरे, सागर, राणे, शेंडे, पिंपरे, लोखंडे, बत्तीसे, पवार, सूर्यवंशी, हिवरे, सोनुने,कर्णकर.मुंढेकर माळी,
संदर्भ
http://www.maliworld.in/Origin_of_society.aspx Archived 2018-08-09 at the Wayback Machine.