Jump to content

माळटिटवी

कल्का, हरयाणा मधील माळटिटवी
पिवळ्या गाठीची टिटवी

माळटिटवी किंवा पिवळ्या गाठीची टिटवी, पिवळ्या गळ्याची टेकवा, हटाटी, मोठी टिटवी किंवा पितमुखी टिटवी (इंग्लिश:Yellow-wattled lapwing; हिंदी:जर्दी, जिर्दी) हा एक पक्षी आहे.

चित्रदालन

माहिती

माळटिटवी नेहमी आढळणाऱ्या टिटवीची ही भारतात सापडणारी दुसरी जात. साधी टिटवी ही पाणथळ जागी हमखास सापडते. तर ही माळटिटवी कोरडय़ा प्रदेशातील माळरानावर पण पाण्याच्याच आसपास आढळते.ही माळटिटवी आपल्याला एकेकटी किंवा जोडीने दिसते. पण क्वचित प्रसंगी आजूबाजूच्या ४/६ टिटव्यासुद्धा एकत्र उडताना दिसू शकतात. हे पक्षी स्थानिक असून एकाच जागी कायम राहतात. त्यांना त्यांची हद्द अतिशय प्रिय असते आणि त्यासाठी ते इतर टिटव्यांबरोबरच दुसऱ्या मोठय़ा पक्ष्यांनाही सहज हुसकावून लावतात. हे पक्षी नेहमी जमिनीवरच आढळतात आणि तुरुतुरु पळत जाऊन मातीतील किंवा पानांखाली दडलेले कीटक पकडून खातात.माळटिटवीचा विणीचा हंगाम उन्हाळ्यात असतो, नर-मादीची जोडी जमल्यावर त्यांचे मीलन होते आणि मादी घरटय़ात ४ अंडी घालतात.

शरीररचना

आकाराने ही टिटवी साध्या टिटवीपेक्षा थोडी लहान असते. हिच्या पंखांचा आणि पाठीचा रंग मातकट तपकिरी असून पोट मात्र पांढरेशुभ्र असते.त्याचे पाय लांब असतात. वाळूच्या रंगासारखी उदी टिटवी असते व काळे डोके असते.उडताना काळ्या पंखावरील पांढरे पट्टे ठळक दिसतात. नर आणि मादी दिसायला सारखे असतात. हे पक्षी समूहाने राहतात.हिला सहज ओळखायची खूण म्हणजे डोळ्यापासून निघून चोचीवरून ओघळणारा पिवळा धम्मक मांसल भाग. यामुळे तिला अगदी दुरूनही सहज ओळखता येते.

वितरण

हे पक्षी भारतात हरयाणा आणि पश्चिम बंगाल, दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत आढळतात. तसेच पश्चिम बांगला देश, पाकिस्तान सिंध आणि श्रीलंका या देशांमध्ये आढळतात.

निवासस्थाने

ते धानाची कापलेली शेते व पडीत शेतीचा प्रदेश अश्या ठिकाणी वास्तव्य करतात.

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली