मालेमे विमानतळ
मालेमे विमानतळ ( ग्रीक: Αεροδρόμιο Μάλεμε) हा ग्रीसच्या क्रीट बेटावरील मालेमे येथील विमानतळ आहे . येथे दोन धावपट्ट्या (13/31 आणि 03/21) आहेत. हा विमानतळ व्यावसायिक विमान वाहतुकीसाठी बंद आहे.
हा विमानतळ १९५९ पर्यंत वापरात होता. २०१२पासून हेलेनिक वायुसेना या विमानतळाचा मर्यादित वापर करते.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४१मध्ये जर्मनीच्या सैन्याने येथे आक्रमण करून ठाण मांडले होते.. [१]
संदर्भ
- ^ Biank, Major Maria A. (2014-08-15). Battle Of Crete: Hitler's Airborne Gamble (इंग्रजी भाषेत). Pickle Partners Publishing. ISBN 978-1-78289-321-9.