मालेगाव
मालेगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे. मालेगाव हे नाशिक जिल्ह्यातिल महत्वाचे शहर असुन महानगरपालिकेचे ठिकाण आहे.
?मालेगाव महाराष्ट्र • भारत | |
— तालुका, शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ३३.५६ चौ. किमी |
मोठे शहर | मालेगाव |
जवळचे शहर | धुळे |
प्रांत | खानदेश |
[[महाराष्ट्र विभाग|विभाग]] | नाशिक विभाग |
जिल्हा | नाशिक |
तालुका/के | मालेगाव |
लोकसंख्या • घनता • मेट्रो लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री | ४,८१,२२८ (२०११) • १४,३३९/किमी२ • ५,७६,६४२ १.०२ ♂/♀ ८७.६१ % • ९०.३५ % • ८४.८१ % |
भाषा | मराठी |
आमदार | दादा भुसे, मंत्री, BSS |
खासदार | सुभाष भामरे, खासदार , धुळे |
विधानसभा (जागा) | मालेगाव आत, मालेगाव बाह्य (२) |
संसदीय मतदारसंघ | धुळे लोकसभा मतदार संघ |
मनपा विभाग | मालेगाव महानगरपालिका |
बोलीभाषा | उर्दु,अहिराणी,मराठी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४२३२०३ • +०२५५४ • एमए४१ |
हैदराबाद संस्थान आर्थिक डबघाईला आल्याने तेथील वीणकरांना निजामाने हाकलुन लावले होते वीणकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची महेश्वर येथे भेट घेवुन रोजगाराची मागणी केली त्यांनी हैदराबादच्या वीणकरांना चरखा,सुत,अन्नपाणी तसेच राहायला जागा दिली त्यास मालेगंज/मालेगाव असे नाव दिले असून आपल्या पुत्राच्या स्मरणार्थ मालेरावांच्या नावाने मालेगाव वसाहत निर्माण केली गेली आहे.
मालेगावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेला एक पुल देखील अस्तित्वात असुन त्यांच्या कार्याची साक्ष देत आजही उभा आहे
दळण वळण
मालेगाव हे शहर मुंबई - आग्रा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर वसलेले नाशिक जिल्ल्यातिल नाशिक नंतरचे सर्वात मोठे शहर तसेच उत्तर महाराष्ट्रातील मोठे शहर आहे. नाशिक नंतर मालेगाव या शहरातुन मोठ्या व महत्त्वाच्या रस्त्यांनी बरोडा, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर व असिरगड सारखी शहरे जोडली गेली आहेत. नाशिक, धुळे, मनमाड, शिर्डी, चांदवड, सटाणा ,नांदगाव, देवळा, चाळीसगाव, साक्री ही जवळची शहरे आहेत.
मालेगाव ते दोंडाईचा राष्ट्रीय महामार्ग 160 H , मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग NH3, असे दोन महामार्ग शहरातून जातात.
भौगोलिक स्थान
मालेगाव हे शहर मोसम व गिरणा नदीच्या काठावर वसले आहे. तसेच मोसम व गिरणा संगम याच शहरात होतो. याच संगमावर संगमेश्वर गावाची ची मुख्य बाजारपेठ वसलेली आहे.
पर्यटन
- गाळणा किल्ला , मालेगाव हून 27 km अंतरावर आहे.
- मालेगाव भुईकोट किल्ला . मालेगावातील महानगरपालिका भवन जवळच असून. मोसम नदी किनारी आहे.
- किल्ले कंक्राळा - मालेगाव पासून 23 km अंतरावर असून, हिरे घराण्याची कुलदैवत हिराई माता मंदिर येथे आहे.
- झोडगे माणकेश्वर टेम्पल - मालेगाव पासून 20 km अंतरावर असून हे एक हिंदू मंदिर असून भगवान महादेवाला समर्पित आहे हे मंदिर 12 व्या शतकात बांधण्यात आलेले आहे. हेमाडपंथी बांधकाम शैलीचे वाखान्याजोगी आहे. मुंबई आग्रा NH3 महामार्ग लगतच आहे. यादव, चालुक्य, आणि शिलाहार राजांनी वेळोवेळी मंदिराचे बांधकाम केले आहे.
- महाराजा
उद्योग
हातमाग, यंत्रमाग,
कृषी
शेती हा मुख्य धंदा आहे. उत्पादन, डाळिंब व कांदा हे मुख्य रोख पिके आहेत. येथे भुईमुगाचीही लागवड होते. ज्वारी, बाजरी व गहू ही धान्येही घेतली जातात.
शिक्षण
मालेगाव शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत.
आरोग्य
प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे
१)कर्मवीर भाऊसाहेब हिरे
२)या. ना. जाधव
३) निहाल अहमद
४) भीमा दादा गवळी
मालेगाव तालुक्यातील गावे
आघार बु., अजांदे, अजंग, अस्ताने, बेलगाव, भारडेनगर, भिलकोट, भुईगव्हाण, बोढे, चंदनपुरी, चौकटपाडा, चिखलाओहळ, चिंचगव्हाण, चिंचवाड, चिंचवे, चोंडी, दाभाडी, दाबली, दहीदी, दहीकुटे, दहिवाळ, दापुर, दसाणे, देवघट, देवारपाडा, ढवळीविहीर, डोंगराळे, डुबगुले, एरंडगाव, गाळणे, गनेशनगर, घाणेगाव (कौ), घोडेगाव, गिगांव, गिलाणे, गुगलवाड, हताणे, हिसवाळ बु., जळगाव बु., जळगाव(निं), जळकु, जाटपाडे, जेउर, ज्वार्डी, कजवाडे, कळवाडी, कंधाणे, कंकराळे, करंजगव्हाण, कौळाणे, खडकी (मालेगाव तालुका), खाकुर्डी, खलाणे, खायदे, कोठरे रावळगाव,रोझ,साजवहाळ,सोनज,वाके ,टाकळी
हे सुद्धा पहा
नाशिक जिल्ह्यातील तालुके |
---|
नाशिक तालुका | इगतपुरी तालुका | दिंडोरी तालुका | पेठ तालुका | त्र्यंबकेश्वर तालुका | कळवण तालुका | देवळा तालुका | सुरगाणा तालुका | सटाणा तालुका | मालेगाव तालुका | नांदगाव तालुका | चांदवड तालुका | निफाड तालुका | सिन्नर तालुका | येवला तालुका |