मालदीव राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
मालदीवचा ध्वज | |||||||||||||
असोसिएशन | मालदीव क्रिकेट बोर्ड | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा | सहयोगी सदस्य[१] (२०१७) संलग्न सदस्य (२००१) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | आशिया | ||||||||||||
| |||||||||||||
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली महिला आं.टी२० | वि नेपाळ पोखरा रंगशाला, पोखरा; २ डिसेंबर २०१९ | ||||||||||||
अलीकडील महिला आं.टी२० | वि नेपाळ पोखरा रंगशाला, पोखरा; ७ डिसेंबर २०१९ | ||||||||||||
| |||||||||||||
२ जानेवारी २०२३ पर्यंत |
मालदीव राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये मालदीवचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ पासून मालदीव महिला आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळला जाणारा प्रत्येक ट्वेंटी-२० सामना हा संपूर्ण महिला टी२०आ आहे.[५][६]
डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या २०१९ दक्षिण आशियाई खेळांमध्ये या संघाने पहिले महिला टी२०आ सामने खेळले.[७][८] कांस्य पदकाच्या प्ले-ऑफ सामन्यात, महिला टी२०आ सामन्यातील दुसऱ्या सर्वात कमी धावसंख्येची नोंद करण्यासाठी मालदीवचा संघ फक्त आठ धावांवर बाद झाला.[९] बॅटमधून फक्त एक धाव आली, बाकी सात धावा वाईड्समधून आल्या.[१०] नऊ क्रिकेट खेळाडू धावा न करता बाद झाले.[११] या स्पर्धेच्या आधी, मालदीव बांगलादेशकडून २४९ धावांनी पराभूत झाला, मालदीवचा डाव अवघ्या सहा धावांत आटोपला.[१२][१३]
संदर्भ
- ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
- ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
- ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
- ^ "All T20I matches to get international status". International Cricket Council. 26 November 2019 रोजी पाहिले.
- ^ "T20s between all ICC members to have international status". ESPNcricinfo. 27 April 2018. 30 November 2019 रोजी पाहिले.
- ^ "Head coach appointed to the historic 1st Maldives national women's cricket squad". Maldives Cricket. 23 November 2019. 30 November 2019 रोजी पाहिले.
- ^ "Nepal's Anjali Chand makes history with figures of 6 for 0". ESPN Cricinfo. 2 December 2019 रोजी पाहिले.
- ^ "Records tumble as Maldives women's cricket team are dismissed for eight". News.com.au. 7 December 2019 रोजी पाहिले.
- ^ "SAG 2019: Maldives cricket team pushed into rough waters, out for 8". SportStar. 7 December 2019. 7 December 2019 रोजी पाहिले.
- ^ "Maldives women cricket team dismissed for 8 runs, 9 players out for zero". India Today. 7 December 2019 रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh women demolish Maldives". Dhaka Tribune. 5 December 2019. 5 December 2019 रोजी पाहिले.
- ^ "SAG 2019: 9 players out for duck, cricket team bowled out for 8". Hindustan Times. 7 December 2019. 7 December 2019 रोजी पाहिले.