Jump to content

मार्न नदी

मार्न नदी किंवा मार्ने नदी ही फ्रान्समधील एक नदी आहे. ही सीन नदीची उपनदी आहे असून मार्न पॅरिसच्या पूर्वेकडील आणि आग्नेय भागात वाहते. या नदीची लांबी ५१४ किलोमीटर (३१९ मैल) आहे. फ्रांसच्या हौ-मार्ने, मार्ने, सीने-एट-मार्ने आणि वाल-दे-मार्ने या विभागांना या नदीचे नाव दिलेले आहे.

मार्न नदीचा उगम लॅन्ग्रेस पठारात होतो. तेथून ही साधारणपणे उत्तरेकडे वाहते आणि सेंट-डिझियर आणि चालोन-एन-शॅम्पेन शहरांच्या मध्ये पश्चिमेकडे वळते. पॅरिसपासून जवळ ही नदी शेरेंटन येथे सीन नदीला मिळते. मार्न नदीच्या मुख्य उपनद्या रोयनॉन, ब्लेझ, सॉल्क्स, ओवरक, पेटिट मोरिन आणि ग्रँड मोरिन आहेत .

पहिल्या महायुद्धात या नदीकाठी दोन मोठ्या लढाया झाल्या. यांतील १९१४मध्ये झालेल्या पहिल्या लढाईनंतर युद्धाला कलाटणी मिळाली. १९१८मध्ये या नदीकाठी अजून एक लढाई झाली.चार वर्षांनी म्हणजे १९१८ मध्ये झाली.

इतिहास

मारणे नदी आणि तिच्या मुख्य उपनद्या
River Marne at Dormans
लेस बॉर्ड्स दे ला मार्ने, 1888 पॉल सेझन ने काढलेले चित्र

संदर्भ