मार्च १९
मार्च १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७८ वा किंवा लीप वर्षात ७९ वा दिवस असतो.
ठळक घटना
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
- १९९८ - भारताचे पंतप्रधानम्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचा शपथविधी
एकविसावे शतक
- २००२ - अफगाणिस्तानमध्ये ऑपरेशन ॲनाकॉंडा सुरू. ५०० तालिबान व अल कायदा सैनिक तर मित्र राष्ट्रांचे ११ सैनिक मृत्युमुखी.
- २००४ - आनाकोस्की, फिनलंड शहरात बस व ट्रकची धडक. २४ ठार, १३ जखमी.
- २००४ - तैवानच्या राष्ट्राध्यक्ष चेन शुइ-बियान वर हल्ला.
- २०१३ - राष्ट्रीय महामार्ग १७वरील खेडजवळ जगबुडी नदीवरील पुलावरून बस नदीपात्रात कोळून ३७ ठार, १५ जखमी.
- २०१७-राष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी भारतीय जनता पक्षाने गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले होते.उत्तर प्रदेशचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी शपथ घेतली.
जन्म
- १८१३ - डेव्हिड लिविंग्स्टन, स्कॉटलंडचा शोधक व धर्मप्रसारक.
- १८४८ - वायट अर्प, अमेरिकन पोलीस अधिकारी.
- १८४९ - आल्फ्रेड फोन टिर्पिट्झ, जर्मनीचा दर्यासारंग.
- १८६० - विल्यम जेनिंग्स ब्रायन, अमेरिकेचा ४१वा परराष्ट्रसचिव.
- १८७१ - शोफिल्ड हे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८३ - वॉल्टर हॅवोर्थ, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ.
- १८८३ - जोसेफ स्टिलवेल, अमेरिकेचा सेनापती.
- १८८९ - मनुएल दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १९०० - फ्रेडरिक जोलियो, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०५ - आल्बर्ट स्पीयर, नाझी अधिकारी.
- १९०६ - आडोल्फ आइकमन, नाझी अधिकारी.
- १९३७ - एगॉन क्रेंझ, पूर्व जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४३ - मारियो जे. मोलिना, नोबेल पारितोषिक विजेता मेक्सिकोचा रसायनशास्त्रज्ञ.
- १९४४ - सैद मुसा, बेलीझचा पंतप्रधान.
- १९५२ - वॉरेन लीस, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - इंदू शहानी, भारतीय शिक्षणतज्ञ.
- १९५६ - येगोर गैदार, रशियन राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ.
- १९८४ - तनुश्री दत्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मार्च १९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च १७ - मार्च १८ - मार्च १९ - मार्च २० - मार्च २१ - (मार्च महिना)