मार्च १४
मार्च १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७३ वा किंवा लीप वर्षात ७४ वा दिवस असतो.
ठळक घटना
पंधरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८८९ - फर्डिनांड फोन झेपेलिनने बलूनचा पेटंट घेतला.
विसावे शतक
- १९०० - गोल्ड स्टॅंडर्ड ऍक्ट मंजूर झाल्यावर अमेरिकेचे चलन अमेरिकन डॉलरची किंमत सोन्याशी निगडीत झाली.
- १९१३ - पहिला भारतीय बोलपट आलम आरा (हिंदी चित्रपट) मुंबईमध्ये प्रदर्शित.
- १९१५ - पहिले महायुद्ध - फॉकलंड द्वीपांजवळ रॉयल नेव्हीशी लढताना पराभव अटळ दिसल्यावर जर्मनीच्या लाइट क्रुझर एस.एम.एस. ड्रेस्डेनच्या खलाशी व अधिकाऱ्यांनी नौका सोडून बुडवली.
- १९२६ - कॉस्टा रिकामध्ये आगगाडी रियो व्हिरियामध्ये पडली. २४८ ठार, ९३ जखमी.
- १९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने चेकोस्लोव्हेकियाचे बोहेमिया व मोराव्हिया प्रांत बळकावले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - पोलंडच्या क्राकोव शहरातील ज्यूंचे राहण्याचे ठिकाण बेचिराख करण्यात आले.
- १९७८ - ऑपरेशन लिटानी - इस्रायेलच्या सैन्याने लेबेनॉनचा दक्षिण भाग बळकावला.
- १९७९ - बीजिंगजवळ सीएएसी कंपनीचे सिडली ट्रायडेंट प्रकारचे विमान कोसळले. विमानातील १२ आणि जमिनीवरील ३२ व्यक्ती ठार. २०० पेक्षा अधिक जखमी.[१]
- १९८० - वॉर्सोजवळ विमान कोसळले. ८७ ठार.
- १९८४ - शिन फेनच्या नेता जेरी ऍडम्स वर बेलफास्टमध्ये असफल खूनी हल्ला.
- १९९४ - लिनक्सची १.० आवृत्ती प्रकाशित.
- १९९८ - इराणमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.
एकविसावे शतक
जन्म
- १८०४ - योहान स्ट्रॉस, सिनियर, ऑस्ट्रियन संगीतकार.
- १८२३ - थियोडोर दि बॅनव्हिल, फ्रेंच लेखक.
- १८४४ - उंबेर्तो पहिला, इटलीचा राजा.
- १८६२ - विल्हेल्म ब्येर्क्नेस, नॉर्वेचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १९६५ - आमिर खान, बॉलिवूड अभिनेता
- १८७९ - अल्बर्ट आइनस्टाइन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८२ - वाक्लाव सियेरपिन्स्की, पोलिश गणितज्ञ.
- १९३३ - मायकेल केन, इंग्लिश चित्रपट अभिनेता.
- १९५८ - आल्बर्ट दुसरा, मोनॅकोचा राजा.
- १९६० - कर्बी पकेट, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १९६३ - ब्रुस रीड, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - आमिर खान, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९८६ - एल्टन चिगुंबुरा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १८८३ - कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक.
- २०१८ - स्टीफन हॉकिंग, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मार्च १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
संदर्भ आणि नोंदी
- ^ सीएएसी ट्रायटेंट २ई प्लेनक्रॅशइन्फो.कॉम. पाहिले: २०१०-०४-०१
मार्च १२ - मार्च १३ - मार्च १४ - मार्च १५ - मार्च १६ - (मार्च महिना)