Jump to content

मार्गो फ्रँक

मार्गो फ्रॅंक
जन्म १६ फेब्रुवारी १९२६ (1926-02-16)
फ्रांकफुर्ट आम माइन, जर्मनी
मृत्यू ९ मार्च, १९४५ (वय १९)
बर्गन-बेल्सन छळछावणी, लोअर सॅक्सोनी, जर्मनी
मृत्यूचे कारण प्रलापक ज्वर
राष्ट्रीयत्व जर्मन (काढून घेतले गेले), डच
ख्यातीद डायरी ऑफ अ यंग गर्ल
धर्म ज्यू
वडील ऑटो फ्रॅंक
आई ईडिथ हॉलंडर-फ्रॅंक
नातेवाईक अ‍ॅन फ्रॅंक (बहीण)

मार्गो बेट्टी फ्रॅंक (१६ फेब्रुवारी, इ.स. १९२६ – ९ मार्च, इ.स. १९४५) ही अ‍ॅन फ्रॅंकची मोठी बहीण होती. तिचा जन्म फ्रांकफुर्ट, जर्मनी येथे झाला. इ.स. १९३३मध्ये नाझी पक्षाने जर्मनीत सत्ताग्रहण केले. याच वर्षी फ्रॅंक कुटुंब जर्मनीतून अ‍ॅम्स्टरडॅमला स्थलांतरित झाले. मात्र इ.स. १९४०पर्यंत नाझी जर्मनीने नेदरलॅंड्सवर सत्ता मिळवली. इ.स. १९४२मध्ये तिला गेस्टापोकडून छळछावणीत पाठविण्यासाठी नोटीस आली. यामुळे सर्व कुटुंबाला त्वरित ऑटो फ्रॅंकच्या कार्यालयातील गुप्त खोल्यांमध्ये लपावे लागले. ४ ऑगस्ट, इ.स. १९४४ रोजी विश्वासघाताने त्यांना पकडण्यात आले व बर्गन-बेल्सन छळछावणीत पाठविण्यात आले. तिथेच ९ मार्च, इ.स. १९४५ रोजी मार्गोचा प्रलापक ज्वराने मृत्यू झाला. अ‍ॅनच्या दैनंदिनीतील नोंदीनुसार मार्गोसुद्धा दैनंदिनी लिहित असे. मात्र तिची दैनंदिनी अद्याप सापडली नाही आहे.