मार्गारेट मिचेल
मार्गारेट मिचेल Margaret Mitchell | |
---|---|
जन्म | नोव्हेंबर ८, इ.स. १९०० अटलांटा, जॉर्जिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
मृत्यू | ऑगस्ट १६, इ.स. १९४९ अटलांटा |
कार्यक्षेत्र | लेखक |
प्रसिद्ध साहित्यकृती | गॉन विथ द विंड |
स्वाक्षरी |
मार्गारेट मनेर्लिन मिचेल (इंग्लिश: Margaret Munnerlyn Mitchell; नोव्हेंबर ८, इ.स. १९०० - ऑगस्ट १६, इ.स. १९४९) ही एक अमेरिकन लेखिका होती. मिचेलला तिने लिहिलेल्या गॉन विथ द विंड ह्या ऐतिहासिक कादंबरीसाठी इ.स. १९३७ साली पुलिट्झर पुरस्कार मिळाला. गॉन विथ द विंड हे तिने लिहिलेले एकमेव पुस्तक आहे.
आजवर सुमारे ३ कोटी प्रति विकल्या गेलेले गॉन विथ द विंड ही जगातील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध कादंबऱ्यांपैकी एक आहे. ह्या कादंबरीवर आधारित ह्याच नावाचा चित्रपट इ.स. १९३९ साली प्रदर्शित झाला. ह्या सिनेमाला विक्रमी १० ऑस्कर पुरस्कार मिळाले होते.
अटलांटा शहरात जन्मापासून राहिलेल्या मार्गारेट मिचेलचा १९४९ साली अपघाती मृत्यू झाला. ती अटलांटामधील पीचट्री स्ट्रीट हा रस्ता पायी ओलांडत असताना मद्यधुंद होउन मोटार चालवत असलेल्या एका टॅक्सी चालकाने तिला ठोकरले ज्यात ती गतप्राण झाली.