Jump to content

मार्गशीर्ष गुरुवार व्रत

मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे.[]महालक्ष्मी या देवतेशी संबंधित हे व्रत महिला करतात.[] या व्र्तालाच वैभवलक्ष्मी व्रत असेही संबोधिले जाते.


हेतू

आपल्या कुटुंबाला धन- धान्य- समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात.

पूजेचे स्वरूप

मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवला जातो. त्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावली जातात, त्यावर नारळ ठेवला जातो.त्या नारळाला देवी समजून तिला सजविले जाते. दागिने , फुलांची वेणी घातली जाते. या देवीची पूजा केली जाते. देवीभोवती आरास मांडली जाते. या व्रताचे महत्त्व सांगणारी पुस्तिका पूजेमध्ये ठेवली जाते. पूजा झाल्यानंतर या पुस्तिकेत दिलेले देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन केले जाते.[] गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविला जातो. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. ब्राह्मणाला दान दिले जाते. सुवासिनी बोलावून हळदी-कुंकू केले जाते आणि त्याना या व्रताचे महात्म्य सांगणारी पुस्तिका भेट दिली जाते.

तयारी

मार्गशीर्ष गुरुवार लक्ष्मी पूजा सजावट

महाराष्ट्रातील गावात आणि शहरात या व्रताची तयारी उत्साहाने केली जाती. देवीचे मुखवटे, पोशाख, दागिने, पूजा साहित्य विकत घेण्यासाठी महिला बाजारपेठेत जाऊन खरेदी करतात.

भारतात अन्यत्र

महराष्ट्राखेरीज भारताच्या अन्य प्रांतात महिला हे व्रत करताना दिसतात. गुरुवारी सकाळी सूर्योदयाला देवीला आवळा, सुकामेवा, खीर, पुरी यांचा नैवेद्य दाखविला जातो.दारात रांगोळी काढून त्यात देवीची पावले काढली जातात. सकाळच्या पूजेनंतर संध्याकाळी पुन्हा पूजा आणि आरती केली जाते आणि अंगणात दिवे लावले जातात.[]

हे ही पहा

मार्गशीर्ष

संदर्भ

  1. ^ a b "मार्गशीर्ष मास के गुरुवार को विशेष रूप से पूजी जाती है मां लक्ष्मी, जानें पूजा विधि व महत्त्व". २१.११.२०१९. 2019-11-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८.११.२०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ शिंदे, सिद्धी (२६.११.२०१९). "Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा विधी, नियम व वैभवलक्ष्मी घट मांडणी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती". २८.११.२०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "श्रीमहालक्ष्मी व्रतकथा - विकिस्रोत". mr.wikisource.org. 2019-11-28 रोजी पाहिले.