मार्क शटलवर्थ
मार्क शटलवर्थ दक्षिण आफ्रिका येथील प्रसिद्ध अब्जाधीश आहेत. मार्क शटलवर्थ यांच्या प्रोत्साहनातून आणि त्यांच्या कॅनोनिकल लिमिटेड ह्या कंपनीच्या प्रायोजनातून त्यांनी उबुंटू लिनक्स या संगणक प्रणालीचा विकास केला. ही प्रणाली स्थापना करण्यास सोपी, वापरण्यास सोपी आणि नियमित निघणाऱ्या आवृत्त्या अशी उबुंटू लिनक्स वैशिष्ट्ये आहेत. ही संगणकप्रणाली मोफ़त असून, त्यात जीनोम हे तंत्रज्ञान वापरले गेले आहे.