मारुती ज्ञानू माने
मारुती ज्ञानू माने (डिसेंबर २७, १९३७ - जुलै २७, २०१०) हे मराठी कुस्तीगीर होते.
जीवन
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुकातील कवठेपिरान गावी मारुतीराव माने यांचा जन्म झाला. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी कुस्तीच्या तालमीस आरंभ केला. राजस्थानच्या कुस्तीगीर महिरुद्दीनचा पराभव करून माने यांना 1964 मध्ये हिंद केसरीचा मुकुट देण्यात आला. तो एकेकाळी जगातील सर्वोत्तम कुस्तीगीरंमध्ये समावेश होता. त्यांना केंद्र शासनाने प्रतिष्ठित ध्यानचंद पुरस्कारही प्रदान केला.
कुस्तीतील कारकीर्द
स्पर्धात्मक कारकीर्द
- ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग
- आशियाई सुवर्ण व रौप्यपदक
- राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता
- हिंदकेसरी
संघटक म्हणून कारकीर्द
- महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष - १९८५ - १९८६
- अखिल भारतीय कुस्तीगीर परिषद सदस्य - १९८१ - २०१०
- अखिल भारतीय माजी मल्ल संघटना - उपाध्यक्ष - १९९२ - २०१०
राजकीय कारकीर्द
- कवठेपिरान ग्रामपंचायतीचे सरपंच
- सांगली जि. प.चे सदस्य - १९६० - १९७२
- राज्यसभा खासदार - १९८५ - १९८६
पुरस्कार
- ध्यानचंद पुरस्कार
संकीर्ण
दिल्लीतील एका रस्त्याला हिंदकसेरी मारूती माने असे नाव देण्यात आले आहे.