Jump to content

मारिना स्वेटाव्हा

मारिना स्वेटाव्हा ह्या रशियन कवयित्री होत्या. त्यांचा जन्म मॉस्को शहरी झाला. तिचे वडील मॉस्को विद्यापीठात प्राध्यापक होते त्याच-प्रमाणे एका व स्तु सं ग्र हा ल या चेसंचा ल क ही होते. आई उत्कृष्ट पियानोवादक होती. स्वेटाव्हाने कुटुंबासह परदेशांत भरपूर प्रवास केला होता. सॉर्बॉन विद्यापीठात तिने शिक्षण घेतले होते. ‘ईव्हनिंग अल्बम’ (१९१०, इं. शी.) हा तिचा पहिला काव्यसंग्रह. ‘झारमेडन’ (१९२२, इं. शी.) ह्या दीर्घ कवितेत तिचे काव्यगुण प्रकर्षाने प्रकटलेले आहेत.


रशियन क्रांतीला तिचा विरोध होता. क्रांतिकाळातल्या तिच्या अनेक कविता या क्रांतीच्या विरोधीआहेत. ‘द स्वान्स कँप’ (१९१७ -२१, इं. शी.) या नावाने तिने लिहिलेल्या कविता क्रांतिविरोधी कवितांमध्ये विशेष उल्लेखनीय होत.ती हयात असताना त्या प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत. १९५७ मध्ये त्या म्यूनिक येथे प्रसिद्ध झाल्या. क्रांतिकारक आणि क्रांतिविरोधी यांच्यात झालेल्या यादवी युद्धाचे हे एक गतिमान इतिवृत्तच होय. क्रांतीच्या विरोधात लढणाऱ्या एका सेनाधिकाऱ्याच्या पत्नीच्या भावनात्मक दृष्टिकोनातून ही काव्यमाला लिहिलेली आहे.

१९२२ मध्ये सोव्हिएट युनियनचा त्याग करून ती बर्लिन आणि प्राग येथे आली आणि नंतर पॅरिसमध्ये स्थायिक झाली. तेथे तिचे बरेचकाव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांपैकी ‘आफ्टर रशिया’ (१९२८, इं. शी.) हा विशेष निर्देशनीय होय. काही पद्यनाटकेही तिने लिहिली. सर्जनप्रक्रिये-वर तिने लिहिले. त्याचप्रमाणे साहित्य-समीक्षात्मक लेखनही तिने केले. त्यांत विख्यात रशियन साहित्यिक ⇨ अलिक्सांद्र पुश्किन ह्याच्यावर लिहिलेला दीर्घ समीक्षात्मक लेख ‘माय पुश्किन’ (१९३७, इं. शी.) समाविष्ट आहे. नाझी जर्मनीने चेकोस्लोव्हाकियाचा ताबा घेतल्यानंतर तिने लिहिलेली ‘व्हर्सेस टू द चेक लँड’ (१९३८-३९, इं. शी.) ही एक उत्कट प्रतिक्रियात्मक कविता.


१९३० नंतरच्या काळात तिला मायदेशाची आठवण येऊ लागली होती. तिच्या नवऱ्यानेही साम्यवाद्यांशी जुळवून घेतले होते. तो त्याच्या मुलीसह सोव्हिएट युनियनमध्ये गेला. १९३९ मध्ये स्वेटाव्हा तेथे गेली पण तिचा नवरा आणि मुलगी हे स्टालिनच्या दहशतवादी राजवटीचे बळी ठरले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मॉस्कोतील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले, तेव्हा तिला एका दूरस्थ शहरी (येलाबुगा) पाठविण्यात आले. तेथे तिला कोणी मित्र नव्हते. कोणाचा आधार नव्हता. ती एकाकी पडली. ह्या अवस्थेत आत्महत्या करून तिने आपली जीवनयात्रा संपवली.

संदर्भ

  1. https://vishwakosh.marathi.gov.in/23609/