मायनॉरिटी स्टडीज (पुस्तक)
मायानोरीटी स्टडीज[१] हे भारतामधील अल्पसंख्याकावरील निबंधांचे संकलन आहे. ते अभ्यासिका रोवेना रोबिनसन[२] यांनी संपादित केले आहे. सन २०१२ साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस यांनी प्रकाशित केले आहे.
महत्त्वाचे मुद्दे
हे पुस्तक कायद्याचे क्षेत्र, प्रशासन आणि भारतातील अल्पसंख्याकाची ओळख यांना स्पर्श करते. या निबंधामध्ये भारतातील अल्पसंख्याकांना कसे ओळखले जाते, त्यांची व्याख्या काय केली जाते, कायदेशीररीत्या त्यांचे कसे प्रवर्ग केले जातात आणि त्यांच्या संस्थिकरणाची प्रक्रिया याचा अभ्यास आहे. आदिवासी व जात या ओळखींच्या आंतरछेदामुळे अल्पसंख्यांक ओळखीला निर्माण झालेल्या आव्हानांच्या अभ्यासाद्वारे अल्पसंख्यांक अभ्यास ही ज्ञानशाखा अल्पसंख्याकांची व्याख्या विस्तृत करते.[३]
संदर्भ सूची
- ^ ISBN 13: 9780198078548
- ^ http://www.hss.iitb.ac.in/en/faculty-profile/rowena-robinson
- ^ http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-bookreview/redefining-the-minority-in- india/article3933581.ece