मानौस
मानौस Manaus | |||
ब्राझीलमधील शहर | |||
| |||
मानौस | |||
देश | ब्राझील | ||
राज्य | अमेझोनास | ||
स्थापना वर्ष | १६६९ | ||
क्षेत्रफळ | ११,४०१ चौ. किमी (४,४०२ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ३०२ फूट (९२ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १९,८२,१७९ | ||
- घनता | १७३.८६ /चौ. किमी (४५०.३ /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी−०४:०० | ||
http://www.manaus.am.gov.br |
मानौस (पोर्तुगीज: Manaus) ही ब्राझील देशाच्या अमेझोनास ह्या राज्याची राजधानी आहे. ब्राझीलच्या उत्तर भागात ॲमेझॉन नदीच्या काठावर व ॲमेझॉन जंगलाच्या मधोमध वसलेले मानौस हे ब्राझीलमधील ८ व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. या शहराची स्थापना १६९३-९४मध्ये साओ होजे दो रियो नेग्रो या नावाने झाली. अनेक नावबदल होत सप्टेंबर ४, १८५६ रोजी शहराचे नाव मानौस करण्यात आले.
मानौस हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील अरेना दा अमेझोनिया ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेतील ४ सामने खेळवले गेले.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2012-04-05 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील मानौस पर्यटन गाईड (इंग्रजी)