Jump to content

माना

  ?माना

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहरअकोला
मोठे मेट्रोनागपूर
जवळचे शहरअकोला ,अमरावती
विभागअकोला
जिल्हाअकोला
भाषामराठी
ग्राम पंचायत माना
कोड
पिन कोड

• ४४४१०६

माना हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यात असलेले एक गाव आहे.

भूगोल

हे गाव उमा नदीच्या काठी वसलेले असून अकोला जिल्ह्यातल्या मुर्तिजापूर तालुक्यात मोडते. ते अमरावती पासून ४० कि.मी. अंतरावर, तर अकोल्यापासून ६० कि.मी. अंतरावर आहे. हे गाव नागपूर-मुंबई महामार्गावर व लोहमार्गावर आहे. माना मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात येते, तर लोकसभेसाठी अकोला लोकसभा मतदारसंघात येते आणि विधान-परिषद (पदवीधर) निवडणुकींसाठी अमरावती मतदारसंघात येते.

ऐतिहासिक उल्लेख

मान्याजवळ इ.स. १९३२ साली सापडलेली रामाची पुरातन मूर्ती

अर्जुनाचा पुत्र बभ्रुवाहन याने मणिपूर, अर्थात माना, नगरी वसवल्याचा उल्लेख श्री हरिविजय ग्रंथात आढळतो. या गावात मोठमोठी मंदिरे, गोपुरे, वाडे कालौघात भूमीखाली गाडली गेली असावीत असे संकेत मिळतात[ संदर्भ हवा ]. उमा नदीच्या तीरावरती गढीवजा किल्ला होता, तेथे खोदकामासाठी गेलेल्या काही मजुरांना ३ जुलै, इ.स. १९३२ रोजी रामाची देखणी मूर्ती सापडली. त्या वेळी ब्रिटीशांची सत्ता होती, तत्कालीन राजवटी ने प्रभू रामचंद्रची मूर्ती नागपूरला नेण्याचे ठरविले. पण गावातील नागरिकांनी मोठा सत्याग्रह करून मूर्ती गावतच ठेवण्यासाठी ब्रिटीशाना भाग पाडले. माना गावाच्या मधोमध इंग्रजांची मोठी छावणी होती, ते याच जागेवरून बऱ्याच प्रांतावर नजर ठेवायचे.


मान्याजवळ ८ मे १९५१ साली सापडलेली कृष्णाची पुरातन मूर्ती

.

भाग्य त्या माना नगरीचे दि ८ मे १९५१ रोजी माना गावाता श्रीकृष्ण प्रभूची मूर्ती नांगरतांना सापडली, भारत स्वातंत्र झाल्यानंतर गावातील काही मंडळी ने पुढाकार घेऊन गावात एक छोटे मंदिर उभारले, पाहता-पाहता गावाची कीर्ती दूरवर पसरली. काही वर्षात मंदिराकाडे बरीच देणगी जमा झाली. आज गावात उभारलेल्या मोठ्या मंदिरात ह्या दोन्ही मूर्त्या विराजमान आहेत.