मानसी सप्रे
मानसी सप्रे या इंग्रजीत लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. त्यांच्या 'पुणे मर्डर क्रॉनिकल' या इंग्रजी कादंबरीने क्रॉसवर्ल्ड बेस्ट सेलर यादीत स्थान पटकावले आहे.
मानसी सप्रे या मूळच्या सांगलीच्या आहेत. त्यांचे वडील प्रा. अविनाश सप्रे हे वाङ्मयसमीक्षक आहेत तर आईचे नाव प्रतिमा सप्रे आहे.
शिक्षण
सप्रे यांनी सांगलीच्या सिटी हायस्कूल, पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतून आणि अमेरिकेतील नॉर्थ टेक्सास युनिव्हर्टीतून शिक्षण घेतले आहे.
व्यवसाय
सप्रे यांनी हैदराबादमध्ये ईटीव्हीमध्ये प्रोग्रॅम प्रोड्यूसर म्हणून काम केले. त्यावेळी टेलिफिल्म आणि मालिकांचे लेखन ते निर्मिती पर्यंतची कामे त्यांनी केली. यानंतर मुंबईमध्ये यूटीव्हीमध्ये आणि लेबारा टेलिकम्युनिकेशन कंपनीत काम केले आहे.
पुणे मर्डर क्रॉनिकल
मानसी सप्रे यांची पुणे मर्डर क्रॉनिकल ही कादंबरी पुण्याच्या पार्श्वभूमीवरील रहस्यकथा आहे. त्यात पुण्यासारख्या शहराची महानगराकडे वाटचाल होताना तेथील बदल आणि त्यातील धोके यात आहेत.