मानसी गिरीशचंद्र जोशी
मानसी गिरीशचंद्र जोशी (जन्म:११ जून १९८९) ही भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आहे, तिने २०१९मध्ये स्वित्झर्लंडच्या बाझलमध्ये झालेली विश्वचषक स्पर्ध जिंकली होती. तिने भारताच्याच पारुल परमार हिला पराभूत करून सुवर्ण पदक मिळविले.
सॉफ्टवेर इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केलेल्या मानसीचा २०११ साली एक भीषण कार अपघात झाला, त्यात तिला एक पाय गमावावा लागला. त्यातून सावरताना तिने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली.[१]
वैयक्तिक आयुष्य आणि पार्श्वभूमी
वयाच्या सहाव्या वर्षापासून मानसीने तिच्या वडिलांबरोबर बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली होती. तिचे वडील गिरीशचंद्र जोशी हे भाभा अणू संशोधन केंद्रातून वैज्ञानिक म्हणून निवृत्त झाले आहेत. लहानपणी मानसीअभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टींमध्ये भाग घेत असे , परंतु बॅडमिंटन तिचा सर्वाधिक आवडता खेळ होता,आणि तिचे वडीलच तिचे पहिले प्रशिक्षक होते.
जरी मानसी सर्वांगीण विकासावर काम करायची, मात्र जोशी कुटुंबात अभ्यासावर नेहमीच अधिक लक्ष्य केंद्रित केले जायचे. गिरीशचंद्र जोशींची अशी अपेक्षा होती की त्यांच्या मुलांची चांगले शिक्षण घ्यावे, म्हणून मानसीने कम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले आणि सॉफ्टवेर इंजिनीअर झाली. [२]
तिने २०१० मध्ये मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या के. जे. सोमय्या इंजिनीअरिंग महाविद्यालयातून इलेक्ट्रानिक्समध्ये पदवी प्राप्त केली आणि सॉफ्टवेर इंजिनिअर म्हणून एका खासगी कंपनीत नोकरीला लागली.
डिसेंबर २०११ मध्ये मानसी दुचाकीवरून ऑफिसला जात असताना, विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने तिला धडक दिली.त्यात तिचा पाय चिरडला गेला. रुग्णवाहिका येण्यास काही तास लागले, त्यामुळे मग पोलिसांना तिला एका तुटक्या स्ट्रेचरवर उचलून दवाखान्यात न्यावे लागले. अपघाताच्या नऊ तासानंतरच तिला योग्य वैद्यकीय मदत मिळाली.ती ४५ दिवस रुग्णालयात भरती होती, कारण तिचा पाय वाचवण्यासाठी डॉक्टरांना दर पाच ते दहा दिवसांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागत होती.पण अखेर गँगरीन झाल्यामुळे त्यांना अखेरीस तिचा एक पाय कापावाच लागला.[२]
यानंतर आयुष्य पूर्वपदावर येण्यास बराच वेळ लागणार होता. मानसीच्या पुनर्वसनाची सुरुवात तिच्यासाठी कृत्रिम पाय शोधण्यापासून झाली ,जेणेकरून तिला पुन्हा चालण्यास मदत होईल. यानंतरच तिला बॅडमिंटनचा पर्याय दिसला, जेणेकरून तिची हालचाल पूर्वीसारखीच व्हावी. कालांतराने तिने अधिक गांभीर्याने प्रशिक्षण सुरू केले, आणि अखेरीस पॅरा बॅडमिंटनच्या भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान पटकावले.
कारकिर्दीतले यश
२०१४ मध्ये व्यावसायिकरीत्या बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केल्यापासून मानसीने अनेक नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. २०१५ मध्ये तिने पॅरा बॅडमिंटन विश्वचषक मिश्र दुहेरीत रौप्य पदक जिंकत मोठी मजल मारली. नंतर २०१७ मध्ये तिने त्याच स्पर्धेत एकेरीत कांस्य जिंकले.[3]
२०१६ मध्ये तिने पॅरा बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीत व महिला दुहेरीत कांस्य जिंकले. त्यानंतर लगेचच २०१७ मध्ये पॅरा बॅडमिंटन विश्व स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. [5]
२०१८ मध्ये मानसी यांनी आशियाई पॅरा गेम्स आणि थायलंड आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य जिंकले. त्यावर्षी, तिने प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथील प्रसिद्ध भारतीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीमध्ये प्रवेश घेतला. या क्षेत्रात नवीन संधी मिळण्याचे श्रेय मानसी त्यांनाच देते. पुढच्याच वर्षी स्वित्झर्लंडच्या बाझल शहरात
झालेल्या पॅरा बॅडमिंटन विश्व स्पर्धेत तिने मानाचे सुवर्ण पदक मिळवले.[2]
२३ नोव्हेंबर २०२० रोजी मानसीची बीबीसीच्या जगभरातील शंभर कर्तृत्त्ववान महिलांच्या BBC 100 Women या यादीत निवड झाली. २०२० मध्येच्या बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इअर पुरस्कारासाठीसुद्धा पाच नामांकित महिला खेळाडूंपैकी मानसी एक होती. [4]
एवढेच नव्हे तर मानसीपासून प्रेरित एक बार्बी डॉलसुद्धा बनवण्यात आलेली आहे. एक कृत्रिम पाय असलेली ही बार्बी बाहुली आंतरराष्ट्रीय कन्या दिवस अर्थात ११ ऑक्टोबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.[6]
बीडब्ल्यूएफ पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप
सुवर्ण पदक - पहिला क्रमांक, २०१९ बाझल, स्वित्झर्लंड
रौप्य पदक - दुसरा क्रमांक, २०१५ स्टोक मँडेविल्ल, इंग्लंडम
कांस्य पदक - तिसरा क्रमांक, २०१७ उल्सान,दक्षिण कोरिया
आशियाई चॅम्पियनशिप
कांस्य पदक - तिसरा क्रमांक, २०१६ आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप
आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप
कांस्य पदक - तिसरा क्रमांक, २०१८ थायलंड पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय महिला एकेरी स्पर्धेत
आशियाई पॅरा गेम्स
कांस्य पदक - तिसरा क्रमांक, २०१८ महिला एकेरी.
पदके
- २०१५ मिश्र दुहेरीत पॅरा-बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत रौप्यपदक.
- २०१६ पॅरा-बॅडमिंटन आशियाई चॅंपियनशिप मधील महिला एकेरीत व महिला दुहेरीत कांस्यपदक.
- २०१७ महिला एकेरीत पॅरा-बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत कांस्यपदक
- २०१८ थायलंड पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनल येथे महिला एकेरीमध्ये कांस्यपदक
- २०१८ मधील आशियाई पॅरा गेम्स महिला एकेरीत कांस्यपदक
- २०१९ पॅरा ऑलिम्पिकमधील महिला एकेरीत सुवर्णपदक[३]
References
Manasi Joshi: The accident that created a world champion (1)
मानसी जोशी: BBC Indian Sportswoman of the Year की नॉमिनी (2)
Who is Manasi Joshi, who won gold at BWF Para Badminton World Championships? (3)
BBC 100 Women 2020: Who is on the list this year? (4)
https://en.wikipedia.org/wiki/Manasi_Girishchandra_Joshi (5)
https://sportstar.thehindu.com/starlife/barbie-welcomes-indian-para-athlete-[permanent dead link] manasi-joshi-to-join-the-sheroes-family-dipa-karmakar-badminton-news/article32845892.ece (6) https://www.bbc.com/marathi/media-51313019
संदर्भ
- ^ Kidangoor, Abhishyant. "This Badminton Star Is Fighting For Disability Rights in India". TIME.com. 2021-02-27 रोजी पाहिले.
- ^ a b "BBC News" (इंग्रजी भाषेत). 2020-02-04.
- ^ "Indian Para badminton team wins 11 medals at World Championships". Firstpost. 2019-08-28 रोजी पाहिले.