मानवी रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण
रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण हा आंतरराष्ट्रीय सांख्यिकी वर्गीकरणाद्वारे (International Statistical Classification of Diseases and Related Health Problems) केला गेलेला एक माणसांना होणारे रोग व त्यांच्या आरोग्यासंबंधीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे सर्व आजारांचे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी एक विशिष्ट संकेतावली तयार केली गेली आहे. तीत शरीराचे बाधित अवयव व रोगाची विविध लक्षणे यांचा विचार केला आहे. या वर्गीकरणाच्या यापूर्वी अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. सध्या वापरात असलेली आवृत्ती आय.सी.डी. १० ICD-10 ही आहे. आय.सी.डी. ११ वर काम सुरू असून ती आवृत्ती इ.स. २०१५ मध्ये तयार होण्याची अपेक्षा आहे.