मानकोपरा
मानकोपरा हे यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव आहे.
Mankopara Maharashtra 445202 https://goo.gl/maps/kkBtXuzs2Un
तहसील → दारव्हा
जिल्हा → यवतमाळ
राज्य → महाराष्ट्र
मानकोपरा विषयी :
मानकोपरा हे गाव कारंजा लाड ते दारव्हा रोडवर आहे.
या गावात प्रामुख्याने उसाचे व कापसाचे पीक घेतले जाते.
अडाण नदीच्या किनाऱ्यावर बसलेले हे गाव समृद्ध आहे.
जनगणना २०११ अनुसार मानकोपरा गावाचे स्थान कोड ५४२५१४ आहे.. हे गाव उपजिल्हा मुख्यालय दारव्हापासून १५ किमी अंतरावर, आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ५६ किलोमीटर अंतरावर आहे. मानकोपरा गावात एक ग्रामपंचायत आहे.
गावाचे एकूण क्षेत्रफळ ५८७ हेक्टर आहे, लोकसंख्या १००० आहे. मानकोपरा गावात २८८ घरे आहेत.
बोदेगाव व चिखली ही मानकोपरा गावाच्या शेजारील गावे आहेत.
देवस्थान :
'जागृत हुडीचा मारुती ' हे या गावातील प्रमुख देवस्थान आहे. दरवर्षी हनुमान जयंतीला यात्रा भरते. भाविक भक्त मंडळी दुरून दुरून दर्शनासाठी येतात, तसेच काही भक्त मंडळी नागपूर मुंबई सारख्या शहरातून सुद्धा दर्शना करता येतात. विशेष म्हणजे,.. हे हनुमंत राया आपल्या भक्ताची मनातील इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे या हनुमंतरायाचं नाव जागृत होडीचा मारुती हे पडले आहे......