Jump to content

माध्यम व्यवस्थापन

माध्यम व्यवस्थापन म्हणजे एक प्रकारे ‘व्यवसाय व्यवस्थापनच’ (बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन) होय

माध्यमाच्या प्रत्येक प्रकारानुसार त्यांच्या अडचणी, समस्या, व्यवस्थापन, अर्थकारण, वेगवेगळे असते. हे खरे जरी  असले, तरी त्यांची मूळ व्यवस्थापन – तत्त्वे आणि मुल्ये एकच असतात. व्यवसाय व्यवस्थापन हाच या सगळ्यांचा पाया आहे.

मॅनेजमेंट गुरू पीटर ड्रकर यांच्या मते माध्यम व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापन शास्त्र आणि प्रत्यक्ष बाजारपेठेतील माध्यम व्यवसायाची विशिष्ट गरज यांची व्यावहारिक सांगड घालणारा किंबहुना या दोन्ही बाबींना जोडणारा पूल किंवा दुवाच आहे.