Jump to content

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित
माधुरी दीक्षित
जन्म १५ मे, १९६७ (1967-05-15) (वय: ५७)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रअभिनेत्री
कारकीर्दीचा काळइ.स. १९८४ -
भाषाहिंदी भाषा, इंग्लिश भाषा , मराठी भाषा
पती
श्रीराम नेने (ल. १९९९)
अपत्ये रयान, अरीण
अधिकृत संकेतस्थळwww.madhuridixit-nene.com

माधुरी दीक्षित (मे १५, इ.स. १९६७ - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने इ.स. १९८०च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९०च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले. त्यांत तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. इ.स. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

आरंभीचे आयुष्य

माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला. माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमारे ८ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते.

चित्रपट कारकीर्द

माधुरी दीक्षित

माधुरीने इ.स. १९८४ साली "अबोध" या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. "दयावान" आणि "वर्दी" यांसारख्या चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्यावर इ.स. १९८८ साली तिला तिचा पहिला मोठा चित्रपट तेजाब मिळाला. त्यात तिची प्रमुख भूमिका होती. ह्या चित्रपटाद्वारे तिला खूप प्रसिद्धी मिळाली; तसेच तिला तिचे पहिले फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकनदेखील मिळाले. त्यानंतर तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये कामे केली. "राम लखन" (इ.स. १९८९), "परिंदा" (इ.स. १९८९), "त्रिदेव" (इ.स. १९८९), "किशन कन्हय्या" (इ.स. १९९०) आणि "प्रहार" (इ.स. १९९१), हे तिचे या काळातील प्रमुख चित्रपट होते. यापैकी काही चित्रपटांत अनिल कपूर तिचा सहकलाकार होता.

इ.स. १९९० मध्ये तिने इंद्रकुमार याच्या दिल चित्रपटात आमिर खान याच्या नायिकेची भूमिका साकारली. त्या वर्षी हा चित्रपट तिकीट खिडकीवरचा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी माधुरीला तिचा पहिला फिल्मफेर पुरस्कार मिळाला.

दिल चित्रपटाच्या यशानंतर माधुरीच्या हिट चित्रपटांची जणू काही मालिकाच सुरू झाली. "साजन" (इ.स. १९९१), "बेटा" (इ.स. १९९२),"खलनायक" (इ.स. १९९३), "हम आप के है कौन" (इ.स. १९९४), " राजा" (इ.स. १९९५) असे अनेक लोकप्रिय चित्रपट तिने दिले. बेटा चित्रपटामधील अभिनयासाठी तिला तिचा दुसरा फिल्मफेर पुरस्कार मिळाला.

"हम आप के है कौन" या चित्रपटाने तर विक्रमी उत्पन्न कमवीत हिंदी चित्रपटसृष्टीच्या तत्कालीन इतिहासात सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक गाठला. या चित्रपटाने भारतात ६५ कोटीं रुपयांहून अधिक, तर परदेशांत १५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटातील अभिनयाने तिला तिचा तिसरा फिल्मफेर पुरस्कार मिळवून दिला. तसेच त्याच वर्षी आलेल्या "अंजाम" या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठीही तिला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. "अंजाम" चित्रपटामधील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून तिला प्रशंसा लाभली.

इ.स. १९९६ या थोड्याशा अयशस्वी वर्षानंतर माधुरी यश चोप्रांच्या इ.स. १९९७च्या "दिल तो पागल है" या चित्रपटात "पूजा" ही व्यक्तिरेखा साकारताना दिसली. या चित्रपटाने व्यावसायिक यशासोबतच समीक्षकांची प्रशस्तीही मिळवली. याच वर्षी प्रकाश झा यांच्या "मृत्युदंड" या चित्रपटातही तिने अभिनय केला. या चित्रपटाने जिनीव्हा तसेच बँकॉक येथील चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकावले.

माधुरी ही गुणी अभिनेत्री तर आहेच, शिवाय एक चांगली नर्तकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. एक दो तीन (तेजाब), हम को आज कल है (सैलाब), बडा दुख दिन्हा (राम लखन), धक धक (बेटा), चने के खेतमे (अंजाम), दीदी तेरा देवर दीवाना (हम आपके है कौन ), चोली के पीछे (खलनायक ), अखिया मिलाऊ (राजा), मेरा पिया घर आया (याराना), के सेरा सेरा (पुकार), मार डाला (देवदास) या गाण्यांमधील तिने केलेल्या नृत्यांची प्रशंसा झाली.

व्यक्तिगत आयुष्य

१७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ रोजी माधुरी दीक्षित डॉ. श्रीराम माधव नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जवळ जवळ १२ वर्षे अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्टोबर २०११मध्ये मुंबई मध्ये परत आली.

आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी मालिका

एकोणीसशे नव्वदीचा काळ गाजवलेल्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने हिच्या आयुष्यावर एक आंतरराष्ट्रीय मालिका येणार आहे. यानिमित्त कार्यकारी निर्माता म्हणून प्रियांका चोप्रा आणि एबीसी स्टुडियोज हिची निर्मिती करत आहे.

माधुरीने अमेरिकेत स्थायी झाल्यावर तिच्या कुटुंबासोबत जगत असताना काय गमतीजमती घडल्या हे या कॉमेडी सीरिजमध्ये दाखवण्यात येईल. ही सिंगल कॅमेरा सीरिज असेल. 'ग्रेज ॲनाटॉमी', 'क्वांटिको' यांसारख्या मालिकांना सुपरहिट करणारी टीम या आगामी प्रोजेक्टसाठी काम करते आहे. (ऑगस्ट २०१७ची बातमी).

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

वर्ष पुरस्कार चित्रपट निकाल
१९८९ सर्वोत्तम अभिनेत्री तेजाबनामांकीत
१९९० प्रेमप्रतिज्ञानामांकीत
१९९१ दिलविजयी
१९९२ साजननामांकीत
१९९३ बेटाविजयी
१९९४ खलनायकनामांकीत
१९९५ अंजामनामांकीत
हम आपके है कौन...!विजयी
१९९६ राजानामांकीत
यारानानामांकीत
१९९८ दिल तो पागल हैविजयी
२००१ पुकारनामांकीत
२००८ आजा नच लेनामांकीत
२०१५ डेढ इश्कियानामांकीत
२००२ सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री लज्जानामांकीत
२००३ देवदासविजयी
२०११ फिल्मफेर विशेष पुरस्कार Overall contribution विजयी
  • १९९४: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट हम आपके हैं कौन
  • १९९५: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट राजा
  • १९९७: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट मृत्य़ुदंड
  • २००२: देवदास मधील भूमिकेसाठी स्टार स्क्रीनकडून उत्कृष्ट सहकलाकारासाठीचे पारितोषिक

मिळालेली नामांकने

  • २०००: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट पुकार
  • १९९८: झी सिने पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट दिल तो पागल है
  • २००२: झी सिने उत्कृष्ट स्त्री सहकलाकार पुरस्कार - चित्रपट लज्जा

मिळालेली नामांकने

  • २०००: झी सिने पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट पुकार
  • २००३: झी सिने पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट देवदास'

नामांकने

  • २००१: आयफा पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट पुकार
  • २००३: आयफा पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट देवदास

नामांकन

  • २००८: स्टारडस्ट स्टार ऑफ दी इयर - चित्रपट आजा नचले

सन्मान आणि पुरस्कार

Dixit on the sets of Jhalak Dikhhla Jaa 5 along with her co-judges Remo D'souza (left) and Karan Johar (right)
  • १९९७: आंध्र प्रदेश सरकारने कलाभिनेत्री" पुरस्कार दिला.[]
  • २००१: राष्ट्रीय नागरिक पुरस्कार
  • २००१: फोर्ब्सने माधुरी दीक्षितला हिंदी चित्रपटसृष्टीतील शिखरावरील ५ ताकदवर लोकांत स्थान दिले[]
  • २००८: भारतीय चित्रपट उत्सव, लॉस एंजल्स येथे सत्कार
  • २०११: पर्ल्स वेव्ह पुरस्कार - "वेव्ह सिल्व्हर क्वीन सन्मान"
  • २०११: HindiFilmNews.Com ने घेतलेल्या मतदानात माधुरी दीक्षित हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आकर्षक नटी ठरली[]

फिल्मोग्राफी

वर्षचित्रपटभूमिकादिग्दर्शकसह कलाकारइतर माहिती
१९८४अबोधगौरीहिरेन नागतपस पाल, शीला डेव्हिड, विनोद शर्मा
१९८५आवारा बापबरखासोहनलाल कंवरराजेश खन्ना, मीनाक्षी शेषाद्री
१९८६स्वातीआनंदीक्रांती कुमारशशी कपूर , शर्मिला टागोर , अकबर खान , मीनाक्षी शेषाद्री , विनोद मेहरा , सारिका
१९८७मोहरेमायाअप्पा दांडेकरनाना पाटेकर , सदाशिव अमरापूरकर , अनुपम खेर, आलोक नाथ
१९८७हिफझतजानकीप्रयाग राजअशोक कुमार , नूतन , अनिल कपूर
१९८७उत्तर दक्षिणचंदाप्रभात खन्नारजनीकांत, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर
१९८८ खतरों के खिलाडीकविता
१९८८दयावाननीला वेल्हूफिरोज खानविनोद खन्ना, फिरोज खान, अमरीश पुरी, आदित्य पांचोली
१९८८तेझाबमोहिनीएन. चंद्राअनिल कपूर , अनुपम खेर , चंकी पांडे , मंदाकिनीनामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९८९ वर्दीजया
१९८९राम लखनराधासुभाष घाईराखी गुलझार , जॅकी श्रॉफ , अनिल कपूर , डिंपल कापडिया , गुलशन ग्रोवर , अमरीश पुरी , अनुपम खेर
१९८९प्रेम प्रतिज्ञालक्ष्मीबापूमिथुन चक्रवर्ती , विनोद मेहरा , रणजीतनामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९८९इलाकाविद्याअझीझ सेजवालधर्मेंद्र, संजय दत्त
१९८९मुजरिमसोनियाउमेश मेहरामिथुन चक्रवर्ती, नूतन
१९८९त्रिदेवदिव्या माथुरराजीव रायनसीरुद्दीन शाह , सनी देओल , जॅकी श्रॉफ
१९८९कानून अपना अपनाभारती
१९८९परिंदापारोविधु विनोद चोप्राअनिल कपूर , जॅकी श्रॉफ , अनुपम खेर , नाना पाटेकरनामांकित, ऑस्कर पुरस्कार
१९८९पाप का अंत
१९९०महा-संग्रामझुमरीमुकुल आनंदविनोद खन्ना , गोविंदा
१९९०किशन कन्हैयाअंजूराकेश रोशनअनिल कपूर, शिल्पा शिरोडकर , अमरीश पुरी
१९९०दिलमधु मेहराइंद्र कुमारआमिर खान , सेड जाफ्री , अनुपम खेरजिंकला, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९०दीवाना मुझसा नाहीअनितावाय. नागेश्वर रावआमिर खान , खुशबू
१९९०जीवन एक संघर्षमधु सेन
१९९० सैलाबडॉ. सुषमा मल्होत्रादीपक बलराज वीजआदित्य पांचोली, शफी इनामदार
१९९०जमाई राजारेखाए. कोद्न्दारमी रेड्डीहेमा मालिनी, अनिल कपूर , अनुपम खेर , सतीश कौशिक
१९९०थानेदारचांदराज सिप्पीसंजय दत्त, जीतेंद्र, जयाप्रदा
१९९१प्यार का देवतादेवी
१९९१खिलाफश्वेता
१९९११०० डेजदेवीपार्तो घोषजॅकी श्रॉफ, मून मून सेन, जावेद जाफरी
१९९१प्रतिकारमधु
१९९१साजनपूजालॉरेन्स डिसूझासंजय दत्त , सलमान खानफिल्मफेअर बेस्ट ॲक्ट्रेससाठी नामांकन
१९९१प्रहारशिर्लेयनाना पाटेकरनाना पाटेकर, डिंपल कापडिया, गौतम जोगळेकर
१९९२बेटासरस्वतीइंद्रकुमारअनिल कपूर, अरुणा इराणी, लक्ष्मीकांत बेर्डे, अनुपम खेरजिंकली, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९२जिंदगी एक जुवाजुहीप्रकाश मेहराअनिल कपूर, अनुपम खेर, शक्ति कपूर
१९९२प्रेम दिवानेशिवांगी मेहरा
१९९२खेलसीमा /डॉ. जडी बुटीराकेश रोशनअनिल कपूर, सोनू वलिया, अनुपम खेर, माला सिन्हा
१९९२संगीतनिर्मला देवी & संगीता
१९९३धारावीड्रिम गर्लसुधीर शर्माशबाना आझमी, ओम पुरी
१९९३साहिबानसाहिबान
१९९३खलनायकगंगा (गंगोत्री देवी )सुभाष घईसंजय दत्त, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, राखी गुलजारनामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९३फुलगुड्डी
१९९३दिल तेरा आशिक़सोनिया खन्ना /सावित्री देवीलॉरेन्स डिसूझासलमान खान, अनुपम खेर
१९९३आंसू बने अंगारे
१९९४अंजामशिवानी चोप्राराहुल रवैलशाहरूख खान, जाॅनी लिव्हर, हिमानी शिवपुरी, दीपक तिजोरीनामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९४हम आपके है कौन ...!निशा चौधरीसूरज बडजात्यासलमान खान, मोहनीश बहल, रेणुका शहाणे, लक्ष्मीकांत बेर्डे, अनुपम खेरजिंकली, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९५राजामधु गरेवालइंद्र कुमारसंजय कपूर, मुकेश खन्नानामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९५यारानाललिता /शिखाडेव्हिड धवनऋषी कपूर, राज बब्बर, कादर खाननामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९६प्रेम ग्रंथकजरीराजीव कपूरऋषी कपूर, अनुपम खेर
१९९६पापी देवता
१९९६राज कुमारराजकुमारी विशाखापंकज पाराशरअनिल कपूर
१९९७कोयलागौरीराकेश रोशनशाहरूख खान, अमरीश पुरी
१९९७महानताजेनया पिंटो
१९९७मृत्युदंडकेतकीप्रकाश झाशबाना आझमी, आयुब खान, मोहन आगाशे, ओम पुरी
१९९७मोहब्बतश्वेता शर्मारीमा राकेश नाथअक्षय खन्ना, संजय कपूर
१९९७दिल तो पागल हैपूजायश चोपराशाहरूख खान, करिष्मा कपूर, अक्षय कुमारजिंकली, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९८बडे मियां छोटे मियांमाधुरी दीक्षितडेव्हिड धवनअमिताभ बच्चन, गोविंदाखास दर्शन
१९९८वजूदअपूर्वा चौधरीएन. चंद्रानाना पाटेकर, मुकुल देव
१९९९आरजूपूजालाॅरेन्स डिसूझाअक्षय कुमार, सैफ अली खान
२०००पुकारअंजलीराजकुमार संतोषीअनिल कपूर, नम्रता शिरोडकर, डॅनी डेंग्झोप्पा, ओम पुरीनामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
२०००गज गामिनीगज गामिनी /संगीता /
शकुंतला /मोनिका /
मोना लिसा
हुसैनशाहरूख खान, नसिरुद्दीन शाह
२००१यह रास्ते है प्यार केनेहादिपक शिवदासानीअजय देवगण, प्रीती झिंटा, विक्रम गोखले
२००१लज्जाजानकीराजकुमार संतोषीमनीषा कोइराला, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, महिमा चौधरी, रेखा, अजय देवगणनामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
२००२हम तुम्हारे है सनमराधाके. एस. आद्यामानशाहरूख खान, सलमान खान
२००२देवदासचंद्रमुखीसंजय लीला भन्साळीशाहरूख खान, ऐश्वर्या रायजिंकली, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार
२००७आजा नचलेदियाअनिल मेहताकोंकणा सेन शर्मा, अक्षय खन्ना, कुणाल कपूर, दिव्या दत्ता, रणवीर शोरी, विनय पाठकनामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
२०१३ बॉम्बे टॉकीजमाधुरी दीक्षित 'आपना बॉम्बे टॉकीज' या गाण्यात विशेष देखावा
२०१३ ये जवानी है  दीवानीमोहिनी अयान मुखर्जी रणबीर कपूर, दीपिका पादुकोण, आदित्य रॉय कपूर, कल्की कोचलीन   स्पेसिअल  ॲंपिअरन्स  इन  सोंग  "घागरा "
२०१४ डेढ  इश्कियाबेगम  पॅरा अभिषेक चौबे हुमा क्युरेशी, नसीरुद्दीन शाहनामांकित - फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
२०१४ गुलाब  गॅंगरज्जो  सौमिक  सेन  जुही चावलागाण्यासाठी पण पार्श्व गायिका "रंगी सारभूलाबी"
२०१८ बकेट लिस्टमधुरा साने तेजस देवस्कर सुमीत राघवन, रेणुका शहाणे
२०१९ टोटल धमालबिंदू इंद्रकुमार अनिल कपूर, अजय देवगण, अर्शद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख
२०१९ कलंकबहार बेगम अभिषेक वर्मन वरुण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूरनामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार

संदर्भ

  1. ^ "AP honours Sridevi, Madhuri" (इंग्रजी भाषेत). 2010-08-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ जानेवारी २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "India's Celebrity Film Stars" (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
  3. ^ "Madhuri is voted as the most desirable Bollywood actress of 2011" (इंग्रजी भाषेत). 2011-09-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-30 रोजी पाहिले.

बाह्य दुवे