माधुरी दातार
भाषातज्ज्ञ म्हणून परिचित आहेत.
शिक्षण
- बी.ए. (फ्रेंच), फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे
- जर्मन, मॅक्स म्युलर भवन, पुणे
- एम.ए
- एम.बी.ए, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, पुणे
वाटचाल
- सुरुवातीच्या काळात दस्तूर हायस्कूल व नंतर सेंट हेलेना हायस्कूल येथे फ्रेंच अध्यापनास सुरुवात केली.
- सी.आय.डी, मुंबई येथे भाषांतरकार आणि दुभाषा म्हणून ०५ वर्षे नोकरी केली. या नोकरीसाठी अरेबिक शिकणे आवश्यक होते म्हणून अरेबिकचे अध्ययन केले.
- किर्लोस्कर कन्सल्टन्सी मध्ये 'डिपार्टमेंट ऑफ लँग्वेजेस' या नावाने एक नवीन खाते दातार यांच्या प्रेरणेतून स्थापन करण्यात आले.
कार्य
- माधुरी दातार यांचे २७ भाषांवर प्रभुत्व आहे. भारतामध्ये भाषाधारित सेवा पुरविण्याचा आरंभ सौ. माधुरी दातार यांनी केला. लँग्वेजेस सर्व्हिस ब्युरो या कंपनीच्या त्या संस्थापक आहेत. [१]
लँग्वेजेस सर्व्हिस ब्युरो
- लँग्वेजेस सर्व्हिस ब्युरोची स्थापना १९७९ साली झाली.[२]
- लँग्वेजेस सर्व्हिस ब्युरो मार्फत २७ भाषांमधून भाषांतर आणि दुभाषा सेवा पुरविण्यात येते.
- १४ भाषांच्या अध्ययनाची येथे व्यवस्था आहे.
संदर्भ
- ^ Dr.Bhooshan Kelkar (2021). MSMErise (The stories of MSME trailblazers) (2nd : 2001 ed.). Pune: Neuflex Talent Solutions Pvt. Ltd, Pune. pp. 119–124.
- ^ "www.languageservicesbureau.com".