Jump to content

माधवी कुंटे

माधवी कुंटे या एक मराठी लेखिका व अनुवादक आहेत. वेद राही यांच्या उत्तमोत्तम हिंदी पुस्तकांचे त्यांनी मराठी अनुवाद केले आहेत.

पुस्तके

  • अथांग (कादंबरी)
  • अधुरी एक कहाणी (अनुवादित; मूळ लेखक - वेद राही)
  • अनंत (अनुवादित, मूळ हिंदी लेखक वेद राही) : जम्मूमधील २००८ साली झालेल्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी)
  • ओशो कथामंजिरी (अनुवादित)
  • गप्पांगण (वैचारिक)
  • जिची तिची कथा (स्त्रीविषयक कथांचा संपादित संग्रह (सहसंपादिका डाॅ. चारुशीला ओक)
  • जीवनमूल्य (ललित लेख)
  • तेजोमय (व्यक्तिचित्रणे)
  • निवडक माधवी कुंटे (कथासंग्रह)
  • प्रकाशफुले (ललित लेख)
  • प्रेमसूत्र (कादंबरी)
  • मर्मबंध (कादंबरी)
  • महाद्वार उघडताना (कथासंग्रह)
  • माझा आनंद माझ्या हाती (व्यक्तिमत्त्वविकास विषयक)
  • मारिया (कादंबरी)
  • ललद्यद (एका काश्मिरी कवयित्रीचे अनुवादित चरित्र; मूळ लेखक - वेद राही)
  • सकारात्मक जीवनदृष्टी (व्यक्तिमत्त्वविकास विषयक)
  • सय (कादंबरी)
  • सहप्रवासिनी (कादंबरी)
  • सुदृढ मानसिकतेसाठी (मानसशास्त्रावरील पुस्तक)
  • स्त्रीसूक्त (सामाजिक)
  • हिरवी पालवी (वैचारिक)
  • हिंसा ते दहशतवाद (वैचारिक)

माधवी कुंटे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • अंकुर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (वर्ष माहीत नाही)
  • मुंबईतल्या दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे १३ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्यावेळी माधवी कुंटे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.