माधवराव शिंदे
माधवराव शिंदे | |
---|---|
जन्म | (मार्च १०, इ.स. १९४५ ग्वालियर, मध्यप्रदेश |
मृत्यू | सप्टेंबर ३०, इ.स. २००१ ) मैनपुरी उत्तर प्रदेश |
मृत्यूचे कारण | विमान दुर्घटना |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
प्रशिक्षणसंस्था | ऑक्सफर्ड विद्यापीठ |
पेशा | राजकारणी |
धर्म | हिंदू |
जोडीदार | माधवीराजे |
अपत्ये | ज्योतिरादीत्य |
वडील | जीवाजीराव |
आई | विजयाराजे |
माधवराव शिन्दे (मार्च १०, इ.स. १९४५ - सप्टेम्बर ३०, इ.स. २००१ ) हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९७१, इ.स. १९७७, इ.स. १९८० आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये मध्य प्रदेश राज्यातील गुणा लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकींमध्ये मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकीत ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव केला. त्यानन्तर ते राजीव गान्धी यांच्या मन्त्रीमण्डळात रेल्वेमन्त्री होते. त्या काळात त्यांनी भारतीय रेल्वेच्या संगणकीकरणावर भर दिला. त्यानंतर ते पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मन्त्रिमण्डळात नागरी विमान वाहतूक मन्त्री आणि मनुष्यबळ विकास मन्त्री होते. इ.स. १९९६ साली त्यांचे नाव जैन हवाला डायरी प्रकरणात गोवले गेल्यानन्तर त्यांनी मन्त्रीपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसबाहेर पडून स्वतःचा मध्यप्रदेश विकास काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाचे उमेदवार म्हणून ते इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले. पी.व्ही. नरसिंह राव यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये परतले आणि त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकीनंतर ते काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाचे उपाध्यक्ष बनले. सप्टेम्बर ३०, इ.स. २००१ रोजी ते लखनौ येथे पक्षाच्या मेळाव्यात भाषण करायला दिल्लीहून विमानाने जात असताना त्यांचे विमान उत्तर प्रदेश राज्यात मैनपुरी जिल्ह्यात कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.