माधव श्रीहरी अणे
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट २९, इ.स. १८८० वणी | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जानेवारी २६, इ.स. १९६८ | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
उल्लेखनीय कार्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
लोकनायक बापूजी अणे उपाख्य डॉ. माधव श्रीहरी अणे (२९ ऑगस्ट १८८० - २६ जानेवारी १९६८) हे एक शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि आधुनिक संस्कृत कवी होते. त्यांना "लोकनायक बापूजी" म्हणजे "लोकनेते आणि आदरणीय पिता" ही पदवी देखील बहाल करण्यात आली होती. ते काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी एक होते. ते जानेवारी १२,इ.स. १९४८ ते जून १४,इ.स. १९५२ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.
टिळकांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे न.चिं. केळकर, काकासाहेब खाडिलकर, गंगाधर देशपांडे, डॉ बी.एस. मुंजे, अभ्यंकर, टी.बी. परांजपे आणि वामन मल्हार जोशी या लोकमान्य टिळकांच्या प्रख्यात शिष्यांपैकी ते पहिले होते. बाळ गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर अणेंनी महात्मा गांधींचे नेतृत्व स्वीकारले तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनाही राजी केले. त्यांनी काँग्रेसला खिलाफत चळवळीत सामील होण्यास विरोध केला तसेच राष्ट्रीय हिताच्या किंमतीवर मुस्लिमांना जास्त आकर्षित करण्याविरुद्ध इशारा दिला. महात्मा गांधी त्यांच्या शांत तर्काचे कौतुक करत, त्यांच्यावर विश्वास ठेवत आणि अनेकदा त्यांचा सल्ला घेत. सुभाषचंद्र बोस आणि जतिंद्र मोहन सेनगुप्ता यांच्यातील वादांची मध्यस्थी करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली.
ते अपक्ष उमेदवार म्हणून इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
त्यांच्या निवडक लेखांचे ‘अक्षरमाधव’ हे पुस्तक निघाले, तर ‘श्रीतिलकयशोर्णव’ या बापूजींनी रचलेल्या संस्कृत काव्यास साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता.[१] बापूजी अणे हे पुसद येथील जंगल सत्याग्रहाशी संबंधित आहेत. 'बापूजी अणे अन् पिवळे दोन आणे' असे त्यावेळी म्हणत असत.
हे ही पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ संजय वझरेकर. "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वतः २९ ऑगस्ट". ३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)