माधव नामजोशी
डॉ. माधव नामजोशी (१९४८ - ३० मे, २०१६) हे पुण्यातील एक होमिओपॅथी डॉक्टर होते. गरजू रुग्णांची ते विनामूल्य तपासणी करत असत.
शैक्षणिक कार्य
यांना वनस्पतिशास्त्र या विषयाची विशेष आवड होती. पुण्यातील मॉडर्न हायस्कूल आणि कोलेज चालवणाऱ्या प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे ते शेवटची तीस वर्षे सदस्य, व बावीस वर्षे उपकार्याध्यक्ष होते.
सोसायटीची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मॉडर्न सेंटर फॉर इन्फर्मेशन टेक्नोलॉजी ॲन्ड रिसर्च ही संस्था उभारण्यातही त्यांचे मोलाचे योगदान होते.
त्यांच्या पत्नी कल्याणी नामजोशी या पी.ई. सोसायटीच्या उपाध्यक्ष आहेत.