Jump to content

माधव गोळवलकर

गोळवलकर गुरूजी
200
टोपणनाव: गोळवलकर गुरूजी,
श्रीगुरूजी
जन्म: फेब्रुवारी १९, इ.स. १९०६
नागपुर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: जून ५, इ.स. १९७३
नागपूर, महाराष्ट्र, भारत
चळवळ: हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी
संघटना: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
धर्म: हिंदू
प्रभाव: डॉ.केशव बळीराम हेडगेवार
स्वामी विवेकानंद
स्वामी अखंडानंद
वडील: सदाशिव गोळवलकर

माधव गोळवलकर हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४०इ.स. १९७३ या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररूपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था-संघटनांना सतत प्रेरणा दिली. श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मूलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केले. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते.

पुरस्कार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रांतातील जनकल्याण समितीतर्फे इ.स. १९९७ सालापासून गोळवलकर गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थविविध क्षेत्रातील व्यक्तींना ’परमपूजनीय श्री गुरुजी पुरस्कार’ दिले जातात.

बाह्य दुवे

मागील
केशव बळीराम हेडगेवार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
इ.स. १९४०इ.स. १९७३
पुढील
मधुकर दत्तात्रेय देवरस