Jump to content

मात्सुयामा (एहिमे)

मात्सुयामा हे जपानमधील एक शहर आहे. एहिमे प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या डिसेंबर २०१४मध्ये ५,१६,४५९ होती. या शहराची स्थापना १५ डिसेंबर, १८८९ रोजी झाली.

मात्सुयामाजवळ जपानमधील सगळ्यात जुने समजले जाणारे गरम पाण्याचे झरे आहेत. येथे दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या कोहिमाच्या लढाईत कामी आलेल्या जपानी सैनिकांचे स्मारक आहे.