Jump to content

मातृतीर्थ (माहूर)

मातृतीर्थ हे माहूर गावाजवळ असणारे एक तीर्थ आहे. (सिंदखेडराजाजवळील मातृतीर्थ वेगळे आहे.)हे माहूर गावापासून सुमारे ३ किमी लांब आहे.हे तीर्थ राज्य सरकारचे संरक्षित स्मारक आहे.

या तीर्थात स्नान केल्याने सर्व पापे नाहिशी होतात असा समज आहे. माहूर परिक्रमेच्या वेळेस या तीर्थात स्नान केले जाते. पूर्वी तेथुनच माहूर गडावर जाण्यास सुमारे १००० पायऱ्या आहेत. सध्या गडावर जाण्यास थेट रस्ता झाल्यामुळे या पारऱ्या सध्या वापरण्यात येत नाहीत.[ संदर्भ हवा ]

अनेक भक्त या तीर्थावर आपल्या मृत आईचे श्राद्ध करतात.त्याने जीवात्म्यास मुक्ती मिळते असे म्हणतात.

याबबतची कथा रेणुकामहात्म्य या ग्रंथात आहे. तसेच गुरुचरित्र या ग्रंथात देखील याचे वर्णन आहे.परशुराम यांनी या तीर्थाची निर्मिती केली अशी आख्यायिका आहे.[ संदर्भ हवा ]