Jump to content

माणदेश

माणदेश हा महाराष्ट्राचा भाग आहे.या भागात माण नावाची वैशिष्ट्यपूर्ण चिकणमाती आढळते. माणदेशाव्यतिरिक्त ही माती इतरत्र सापडत नाही. या भागातून माण नदी वाहते, त्यामुळे याला माणदेश असे नाव पडले. माण नदीलाच माणगंगा म्हणतात. ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातून वाहणारी पूर्ववाहिनी नदी आहे. या नदीचा उगम माण तालुक्यातील कुळकजाई भागाच्या परिसरातील सीतामाई डोंगररांगातून होतो. पुढे ती सरकोळी येथे भीमा नदीला मिळते. या नदीच्या काठाला असलेल्या सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील परिसराला माणदेश म्हणतात. माणदेश च्या मातीतील लेखक जयराम शिंदे यांची अनेक प्रकारची पुस्तके  माणदेश प्रकाशन स्वरूपात आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून. लेखक जयराम शिंदे यांनी माणदेश प्रकाशन मधून सातारा जिल्हा माहिती पुस्तक संपादित केले असून त्यात माणदेशची संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे


माणगंगा नदीवर ३२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. नदीच्या एका काठाला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी, झाडाझुडपांनी नटलेला परिसर, पुरातन मंदिरे व औषधी वनस्पती होत्या. सद्यस्थितीतील नदी परिसर काटेरी झुडपांनी वेढला आहे.

मराठी साहित्यिक ग.दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर या बंधूंचे बालपण माणदेशातील माडगूळ गावी गेले. व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिलेल्या माणदेशी माणसे या पुस्तकात या परिसरातील लोकांची व्यक्तिचित्रणे आहेत. शंकरराव खरात हे माणदेशातील थोर साहित्यिक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.शंकरराव खरातांचे तराळअंतराळ हे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे.

शिखरशिंगणापूर, भोजलिंग गड,खरसुंडी,मोही ,दिवड,म्हसवड,पिंगळी,सीताबाई,मलवडी आणि गोंदवले ही माणदेशातील प्रसिद्ध देवस्थाने आहेत.

माणदेशी भाषेतील काही प्रचलित शब्द

  • जित्राब = पशू पक्षी
  • वाईच, उलीस = कमी
  • बावटा = खांदा
  • लय, मैंदुळं = जास्त, खूप
  • उलीसं = थोडेसे
  • कळवंडी= भांडणे
  • ग्वाड = छान
  • वंगाळ= ओंगळवाणे
  • आधाशी= हावरट
  • लागीर = दुःख,जखम
  • बासान = घरगुती भांडी
  • वाकळ = गोधडी
  • चांडा = मुद्दामहून कृती करणारा
  • झंपर = चोळी
  • पैरण = शर्ट/सदरा
  • चेंगाट = चिकट
  • बोड्या = जोड शब्द खुळ्या बोड्याच, अडाणी बोड्याचं
  • धाकला = लहान
  • ध्वाडी = पुतणी (मोठ्या दिराची मुलगी)
  • इवाय = मुलीचे वडील आणि सासरा यांचे नाते (व्याही)
  • इणीबाय= विहीनबाई
  • फुई = मोठी चुलती

• बरिकराव = छोटा दीर • माय = सर्वात छोटी चुलती

  • नानी = लहान चुलती
  • व्हंजी = मोठी जावं/ मोठी वहिनी
  • वन्स = भावजय(नणंद)
  • दिवानसाब= मोठी नणंद
  • मिरचीबाई = कडक किंवा रागीट नणंद
  • मैतर= मित्र
  • शेरडं = शेळ्या
  • गुर = जनावरे
  • डोबार= म्हैस

• परडा = गोठा

  • सायाळ= साळिंदर
  • म्हवाचं पोळं= मधमाश्यांचे मोहोळ
  • बळय= बगळा
  • पाचुंदा = पाच पेंढ्या
  • टीम टीम = तीन चाकी गाडी
  • टमरेळ/चिंपाट = लहान डब्बा/बादली
  • सांचीपार = संध्याकाळ
  • यदाळा = यावेळेपर्यंत, आतापर्यंत
  • म्होरं= पुढे
  • व्हती = होती
  • न्हाय/न्हवं = नाही
  • अमासनी = आम्हाला
  • व्हरा = गप्पा
  • कुरळी = नीमत्त
  • पाचकळ = अर्धसत्य

• अदमाशी = अर्धवट

  • भसाकने = मधेच बोलणे
  • दादरा = पुल
  • पुंगास = घाणेरडा

• कुमाट = कुजका

  • बारका = लहान
  • टपाल = डोक्याचे केस
  • कावार = वादळ
  • वायदुळ/कायदुळ = लहान चक्राकार वादळ
  • वगळ= ओहोळ
  • मयंदाळ = खूप
  • हाडदन = जेवणे
  • निसळणे = धुणे
  • वलणी = कपडे /ठेवण्याची वाळवण्याची दोरी
  • सरंबाड =बाजरी/ज्वारीची कणसेकाडल्यानंतरची पेंडी
  • सरंबड = गावठी दारू
  • गुमान= गप्प बसून
  • हुमान = शब्द कोटी/कोडे
  • सरमाडी= गावठी हातभट्टीची दारू
  • निर्गी= गावठी दारू
  • तलंग= कोंबडी चे पिल्लू
  • पाट = शेळीचे मादी पिल्लू
  • कावाधरन= कधी पासून

संदर्भ

महाराष्ट्राचे उपप्रांत
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ