माघे संक्रांती
माघे संक्रांती हा सूर्याच्या उत्तरायणाशी संबंधित सण नेपाळ येथे साजरा केला जातो.[१] नेपाली भाषेत या सणाला घ्यःचाकु संल्हु म्हणले जाते. विक्रम संवताच्या माघ महिन्यात आणि ग्रोगोरीयन तारखेनुसार १४ जानेवारी या दिवशी हा सण साजरा होतो. हा दिवस नूतन वर्षाचा प्रारंभ दिवस म्हणून साजरा होतो.
स्वरूप
हिंदू भाविक भगमती, गंडकी या नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात. उत्सवाचा आनंद वाढविण्यासाठी लाडू, तूप आणि रताळी यांचा वापर केलेले पदार्थ तयार केले जातात. मामाच्या घरी भेट देऊन भाचा आणि भाची त्याचे आशीर्वाद घेतात. मामा त्यांना मंगल तिलक लावतात. हा दिवस सूर्याच्या उत्तरायणाशी संबंधित असल्याने सूर्याची पूजा केली जाते आणि पुढच्या शेतीच्या हंगामासाठी सूर्याला प्रार्थना केली जाते.[२]
संदर्भ
- ^ Melton, J. Gordon (2011-09-13). Religious Celebrations: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations [2 volumes]: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 978-1-59884-206-7.
- ^ "Maghe Sankranti 2022 in Nepal: Know Date, Significance of Nepalese Festival Observed on First of Magh in the Vikram Sambat or Yele Calendar | 🙏🏻 LatestLY". LatestLY (इंग्रजी भाषेत). 2022-01-14. 2022-01-17 रोजी पाहिले.