Jump to content

माघ पौर्णिमा

माघ पौर्णिमा ही माघ महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.


बौद्ध धर्मांत

माघ पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी तथागत बुद्धांनी वैशाली नगरीमध्ये इ.स.पू. ४८३ला ४५ वा वर्षावास केला होता. तथागतांनी माघ पौर्णिमेलाच आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा व माघ पौर्णिमा एवढेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी बौद्ध राष्ट्रात आणि जम्बुद्विप भारतातील बौद्ध धम्मीय लोक हा माघ पौर्णिमेचा सोहळा साजरा करतात. या पौर्णिमेला बुद्ध मुर्तींची मिरवणूक काढली जाते आणि धम्माची शिकवण घेऊन अष्ठशीलाचे व्रत केले जाते.

हिंंदु कृृषी संंस्कृृतीत

माघ पौर्णिमेला “नव्याची पुनव” म्हणतात. नव्याची म्हणजे नवीन धान्याची. भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा शेतीशी संबंधित असाच सण आहे.पश्चिम महाराष्ट्रात शेतात पिकलेल्या नवीन धान्याची मुठीच्या आकाराची पेंधी एक किंवा दोन आणतात. त्या घराच्या दाराजवळ बांधतात. मग मातीच्या पाच चपट्या मूर्ती तयार करून उंब-याजवळ सारवलेल्या जमिनीवर त्या ठेवतात. अंगणात नवीन धान्याची नैवेद्य शिजविला जो. तो या मूर्तींना आणि ग्रामदेवतेला दाखवितात. ज्वारीची पाच ताटे आणतात.त्यांच्या टोकाला गाठ मारतात. गव्हाच्या पाच मुठीएवढ्या पेंढ्या तेथे ठेवल्या जातात. या ताटात कणकेचे पाच दिवे करून लावतात व त्यांची पूजा करतात. त्याशिवाय नवीन आलेले धान्य खायचे नाही अशी पद्धत आहे. काही ठिकाणी धान्याची एक पेंढी रानातच एका मेढीला बांधून ठेवतात. त्या मेढीची पूजा करून तिला धान्याचे पाच दाणे आणि नव्या धान्याचा नैवेद्य दाखवितात. काही शेतकरी धान्याचे खळे करतानाच खळ्याच्या मध्यभागी पेंढी पूजतात व मगच खळे करण्यास प्रारंभ करतात.

विविध समाजगटातील प्रथा

मराठा कुणबी लोक भात कापून त्याचा ढीग घातल्यावर ते झोडपण्यापूर्वी सा दगडांची पूजा करून त्यांना बळी देतात. सात दगड म्हणजे पाच पांडव आणि दोन वनदेव. वारली लोक भात तयार झाल्यावर तो खाण्यापूर्वी नृत्य करतात. भाताच्या राशीवर नारन नावाच्या देवीची स्थापना करून तिच्याभोवती पुरुष फेर धरून नाचतात. ओरिसामध्ये भुवान नावाचा देव शेताचे रक्षण करतो. या देवाला अफू आणि काकवीचा नैवेद्य दाखवितात. कर्नाटकात शेतकरी भाताची कापणी करण्यापूर्वी काहे रोपे कापून त्याची शेतातच पूजा करतो. त्याच्या लोंब्या घराच्या खांबाला किंवा छपराला बांधतात. या सणाला ‘ होस्थू’ असे म्हणतात.[]

हे ही पहा

  • बौद्ध सण
  1. ^ भोसले द.ता. संंस्कृृतीच्या पाऊलखुणा 2013