माख क्रमांक
द्रायुगतिशास्त्रामध्ये एखाद्या बिंदूला प्रवाहाच्या वेगाचे स्थानिक माध्यमातील आवाजाच्या वेगाशी गुणोत्तर म्हणजे माख क्रमांक (M) होय. माख क्रमांक ही मितिहीन राशी आहे.
जिथे:
- M = माख क्रमांक, (प्रवाह वेग/ध्वनिवेग)[१]
- u = प्रवाहाची स्थानिक गति, आणि
- c = माध्यमातील आवाजाचा वेग.
व्याख्येनुसार, माख १ म्हणजे आवाजाचा वेग. माख ०.६५ म्हणजे आवाजाच्या वेगाच्या ६५% वेग (सबसॉनिक), आणि माख १.३५ म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा ३५% जास्त वेग (सुपरसॉनिक).
माख क्रमांकाचे वर्गीकरण
वर्ग | माख | नॉट | मैल/तास | किमी/तास | मीटर/सेकंद | सामान्य वैशिष्ट्ये |
---|---|---|---|---|---|---|
सबसॉनिक | <०.८ | <५३० | <६०९ | <९८० | <२७२ | सडपातळ पंखांची प्रोपेलरने चालवलेली टर्बोफॅन विमाने. |
ट्रान्सॉनिक | ०.८-१.२ | ५३०-७९४ | ६०९-९१४ | ९८०-१,४७० | २७३-४०९ | प्रवासी विमाने, काही लढाऊ विमाने. |
सुपरसॉनिक | १.२–५.० | ७९४-३,३०८ | ९१५-३,८०६ | १,४७०–६,१२६ | ४१०–१,७०२ | आधुनिक लढाऊ विमाने, एफ-१०४ स्टारफायटर, एसआर-७१ ब्लॅकबर्ड आणि कॉंकॉर्डे. |
हायपरसॉनिक | ५.०–१०.० | ३,३०८-६,६१५ | ३,८०६–७,६८० | ६,१२६–१२,२५१ | १,७०२–३,४०३ | ६.७२ माख वेगाचे एक्स-१५ सर्वात वेगवान विमानांपैकी एक आहे. बोइंग एक्स-५१ |
उच्च-हायपरसॉनिक | १०.०–२५.० | ६,६१५-१६,५३७ | ७,६८०–१९,०३१ | १२,२५१–३०,६२६ | ३,४०३–८,५०८ | माख ९.६ एवढा सर्वोच्च वेग असणारे नासा एक्स-४३ सर्वात वेगवान विमानांपैकी एक आहे. |
पुनर्प्रवेश वेग | >२५.० | >१६,५३७ | >१९,०३१ | >३०,६२६ | >८,५०८ | स्पेस शटल |
संदर्भ आणि नोंदी
- ^ निमकर, द. पां.; करंदीकर, शं. वा. झोत प्रचालन. मराठी विश्वकोश (वेब ed.). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. 21 फेब्रुवारी 2017 रोजी पाहिले.CS1 maint: multiple names: authors list (link)