माइक पेन्स
माइक पेन्स Mike Pence | |
अमेरिकेचा ४८वा उपराष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ २० जानेवारी २०१७ – २० जानेवारी २०२१ | |
राष्ट्राध्यक्ष | डॉनल्ड ट्रम्प |
---|---|
मागील | ज्यो बायडेन |
पुढील | कमला हॅरिस |
इंडियाना राज्याचा गव्हर्नर | |
कार्यकाळ १३ जानेवारी २०१३ – ९ जानेवारी २०१७ | |
प्रतिनिधींचे सभागृहाचा सदस्य | |
कार्यकाळ ३ जानेवारी २००१ – ३ जानेवारी २०१३ | |
जन्म | ७ जून, १९५९ कोलंबस, इंडियाना |
राजकीय पक्ष | रिपब्लिकन |
धर्म | रोमन कॅथलिक |
सही |
मायकेल रिचर्ड पेन्स (इंग्लिश: Michael Richard "Mike" Pence; ७ जून, १९५९:कोलंबस, इंडियाना, अमेरिका - ) हा एक अमेरिकन राजकारणी व देशाचा भूतपूर्व उपराष्ट्राध्यक्ष आहे. २०१६ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत पेन्स रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्पबरोबर उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी केली. ह्या लढतीत ट्रम्प-पेन्सने डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन-टिम केनला अनपेक्षितरीत्या हरविले. उपराष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी पेन्स २०१३ ते २०१७ दरम्यान इंडियाना राज्याचा गव्हर्नर तर २००१ ते २०१३ दरम्यान प्रतिनिधींचे सभागृहाचा सदस्य होता.
एक कट्टर पुराणमतवादी मानला जाणारा पेन्स समलिंगी विवाह, गर्भपात इत्यादींच्या विरोधात आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत