माइंत्स
माइंत्स Mainz | ||
जर्मनीमधील शहर | ||
| ||
माइंत्स | ||
देश | जर्मनी | |
राज्य | ऱ्हाइनलांड-फाल्त्स | |
क्षेत्रफळ | ९७.८ चौ. किमी (३७.८ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ||
- शहर | १९,७,७७८ (इ.स. २००९) | |
- घनता | २,०२३ /चौ. किमी (५,२४० /चौ. मैल) | |
http://www.mainz.de/ |
माइंत्स (जर्मन: Mainz) ही जर्मनी देशातील ऱ्हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्याची राजधानी आहे. माइंत्स शहर ऱ्हाईन नदीच्या काठावर वसले आहे. माइंत्साला सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. एके काळी रोमन साम्राज्याच्या सर्वांधिक उत्तरेकडील सीमेवरील महत्त्वाचे दुर्ग-ठाणे असलेले माइंत्स ऱ्हाइन नदीच्या पश्चिम तीरावर व्यूहात्मक वर्चस्व राखून असे. युरोपातील पुस्तक छपाईच्या तंत्राचा पाया घालणाऱ्या गुटेनबर्गाच्या इ.स. १४५० मधील छापखान्याचा आविष्कार याच शहरात झाला.
बाह्य दुवे
- माइंत्स शहराचे अधिकृत संकेतस्थळ (जर्मन मजकूर) Archived 2010-08-03 at the Wayback Machine.