Jump to content

मांडवी एक्सप्रेस

मांडवी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी गाडी आहे. ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोव्यामधील मडगांव स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसला मुंबई ते गोवा दरम्यानचे ७६५ किमी अंतर पार करायला ११ तास व ३५ मिनिटे लागतात. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशामधून जात असलेल्या ह्या गाडीला गोव्यातील मांडवी नदीचे नाव दिले गेले आहे.

दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस व कोकण कन्या एक्सप्रेस ह्या दोन गाड्या देखील मुंबई व गोव्यादरम्यान रोज धावतात. ही एलएचबी डब्यासह धावते फूड किंग म्हणून प्रसिद्ध ट्रेन आहे. हिचा कोकण कन्या एक्स्प्रेस याच मार्गावर धावणाऱ्या गाडी बरोबर रेक शेअर करते

तपशील

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१०१०३मुंबई छशिट – मडगांव जंक्शन०७:१०१८:४५रोज
१०१०४मडगांव जंक्शन – मुंबई छशिट०९:१५२१:४०

थांबे

बाह्य दुवे