मांगेलवाडा
?मांगेलवाडा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | .१३ चौ. किमी |
जवळचे शहर | पालघर |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता | १,४०३ (२०११) • १०,७९२/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | मांगेली |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • +०२५२५ • एमएच४८ |
मांगेलवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
केळवे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला केळवे मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. केळवे रेल्वे स्थानकापासून हे गाव ८ किमी अंतरावर आहे.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
लोकजीवन
हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३११ कुटुंबे राहतात. एकूण १४०३ लोकसंख्येपैकी ६७९ पुरुष तर ७२४ महिला आहेत. गावाची साक्षरता ८७.६२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९२.८३ आहे तर स्त्री साक्षरता ८२.८४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ११९ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या ८.४८ टक्के आहे. मुख्यतः मांगेली समाजातील लोक येथे राहतात.त्यांचा मुख्य व्यवसाय समुद्रात मासेमारी करणे हा आहे. अलीकडे केळवे पर्यटन स्थळ झाल्यामुळे पर्यटकांना जेवण व राहण्यासाठी रिसॉर्ट व्यवसाय ही केला जातो.
नागरी सुविधा
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर तसेच केळवे रोड रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्षा सुद्धा पालघर तसेच केळवे रोड रेल्वे स्थानकावरून दिवसभर उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
टोकराळे, बांदते, झांझरोळी, केळवे रोड, केळवे, मायखोप, रोठे, लालठाणे, गिरनोळी, सागवे, कोकणेर ही जवळपासची गावे आहेत.केळवे आणि मांगेलवाडा ही गावे केळवे ग्रामपंचायतीमध्ये येतात.
संदर्भ
१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html