Jump to content

मांगवाडी

मांगवाडी MANGWADI

  ?मांगवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहररिसोड
जिल्हावाशिम जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

मांगवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.

इतिहास

मांगवाडीचा पौराणिक इतिहास

मांगवाडी (मंगलवाडी) या गावाचा संदर्भ रामायणात उल्लेख असलेल्या दंडकारण्यातील गांव असून. या गावाची ओळख फार जुनी व पौराणिक असल्याचे सांगितले जाते.

या गावाचे नांव हे शबरीचे गुरू मातंग ऋषींच्या नावावरून पडले आहे.

या गावाच्या आजूबाजूला जी गावे आहेत ती ऋषींच्या नावाची आहेत, जसे भर जहागीर (येथे भारद्वाज ऋषीचे मंदिर आहे), कंकरवाडी (कपिल मुनी), आगरवाडीला (अगस्त्य मुनी), '''रिसोड'''(ऋषिवट) अशी पौराणिक नावे आहेत.

दुसरी आख्यायिका

सप्त चिरंजीवांपैकी मार्कंडेय ऋषी यांची तपोभूमी असून ती गावाच्या दक्षिण दिशेस असून आगरवाडी गावाच्या शिवेस लागून असून त्या ठिकाणी महादेवाच्या लिंगाची प्राचीन स्थापना आहे. व वडाचे मोठे झाड आहे व बाजूला एक जुना विहिरा (कुंड) आहे.

सध्या हे शिवलिंग बळीराम सयाजी आरगडे यांच्या शेतात आहे.

या शिवलिंगाची स्थापना मार्कंडेय ऋषीनी केली असे सांगितल्या जाते.

राजकीय मांगवाडी

मांगवाडी हे गांव महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातल्या वाशीम जिल्ह्यामधील रिसोड तालुक्यातील एक गांव आहे.

गावाची लोकसंख्या २००१ नुसार २४६१ आहे.

आजूबाजूचे गांवे

शेलू खडसे, गणेशपूर, मोठेगांव, रिसोड, कंकरवाडी, आगरवाडी, भर (जहागीर), नेर (उजाड गांव)

मांगवाडीचा समाज बांधव

गावांत मराठा, आदिवासी, मातंग, बौद्ध, मारवाडी, घिसडी (लोहार), वंजारी, समाजाचे लोक रहातात.

मांगवाडीची शेती

गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गावात जास्तीत जास्त लोक कोरडवाहू शेती करतात. सोयाबीन, तूर, हरबरा गहू ही मुख्य पिके आहेत.

मांगवाडीची उद्योग

बालाजी सहकारी सूतगिरणी

गावामध्ये बालाजी सहकारी सूतगिरणी नावाची गिरणी ६५ एकर जमिनीवर होती; ती काही काळ चालून पुढे बंद पडली.

बालाजी सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष बाबाराव खडसे यांनी १९९२ साली सूतगिरणीचे रजिस्ट्रेशन केले.

मांगवाडीची हनुमान संस्थान कमिटी

मंदिरे

मांगवाडीचे हनुमान मंदिर

मांगवाडी येथील हनुमान मंदिर हे फार पुरातन आहे. जुने मंदिर दगडी होते. मंदिरासमोर वर टिनाचे पत्रे व खाली दगडी फरशी असलेला मोठा मंडप होता. मंदिराच्या समोर डाव्या बाजूस फार जुने आणि मोठे वडाचे झाड होते. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी ते तोडले.

हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार

या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार झाला अधिक माहितीसाठी व्हीडिओ पहा

वै. नारायणगिर बाबा (गोसावी) यांची समाधी मंदिरात आहे.

वै. नारायणगिर बाबा हे मुळचे वाढोणा ता. सेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणचे होते. ते अविवाहित होते. गावातील लोकांचे आजार बरे करण्याची विद्या त्यांच्याकडे होती.

असे जुने सांगितले जाते की ते हात फिरवून आजार (रोग) बरे करत असत. ( माहितीगार: काशीराम नथ्थूजी मवाळ. वय : ८२ वर्ष (२०१७ला)

दगडी गोळ्या

वडाच्या झाडाखाली गोल दगडी गोळ्या होत्या. गावातील माणसे त्या उचलून खांद्यावरून मागच्या दिशेन टाकत असत.

मूर्ती

जुनी मूर्ती फार मोठी दिसत होती, कारण शेंदुराच्या थरांनी ती अवाढव्य झाली होती.

नगरभोजन

येथील ग्राम दैवत हनुमान हे जागृत दैवत असून लोक दरवर्षी आपला नवस फेडतात. हा जागृत हनुमान नवसाला पावत असल्यामुळे दरवर्षी लोक आपला नवस नगरभोजनाच्या रूपाने फेडतात.

हनुमान जयंती जन्मोत्सव

हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ४ वाजता हनुमंताला पंचामृताने स्नान घालून अभिषेक केला जातो. मंदिराला लोक आपल्या खुशीने फुलांचे तोरण इत्यादी लावून शोभिवंत करतात.

मांगवाडीत चालणारे अखंड कार्यक्रम

हनुमान मंदिरात भजनी मंडळीचा अखंड हरिपाठ

१९९० सालापासून दररोज सायंकाळी सार्वजनिकरीत्या संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ म्हणण्याची प्रथा पडली आहे. या हरिपाठाला दररोज विणेकरी म्हणून निवृत्ती महाराज पौळ यांचा सहभाग असतो. २०१६ पासून गावातील पांडुरंग वाळके, अंबादास पौळ, कुंडलिक गीते, बाळकृष्ण मोरे, गजानन दानमोडे, जनार्दन चिभडे, गणेश मोरे, हे नवीन तरुण मंडळ हरिपाठासाठी उपस्थित असते.

हनुमान मंदिरात महिला भजनी मंडळीचा अखंड हरिपाठ

महिला भजन मंडळ यांच्या कडून दररोज रात्री ८ नंतर सार्वजनिकरीत्या संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ म्हणण्याची प्रथा पडली आहे. या हरिपाठासाठी श्रीमती दराबाई ग्यानुजी वाळके, सौ.लक्ष्मीबाई विश्वासराव मोरे, कांताबाई आश्रुजी पौळ, सौ.पुष्पाबाई विठ्ठल मोरे, श्रीमती कावेराबाई रामेश्वर मोरे, श्रीमती आसराबाई वाळके, श्रीमती शोभा सरगड, सौ, राहीबाई लक्ष्मण वाळके उपस्थित असतात.

ग्रामपंचायतीमधील महिला भजनी मंडळीचा अखंड हरिपाठ

ग्रामपंचायतीमध्ये महिला भजन मंडळाकडून दररोज रात्री ८ नंतर सार्वजनिकरीत्या संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ म्हणण्याची प्रथा पडली आहे. श्रीमती जिजाबाई नारायण वाळके, सौ. सरसाबाई तुकारामजी वाळके, सौ. वच्छलाबाई साहेबराव वाळके, श्रीमती दगडाबाई शेषराव वाळके, श्रीमती नर्मदाबाई वाळके, श्रीमती आसराबाई जनार्दन वाळके, श्रीमती जनाबाई नामदेव वाळके उपस्थित असतात.

अखंड काकडा

याशिवाय दररोज सकाळी ५ ते ६:३० या वेळेत वारकऱ्यांचे काकड आरतीचे भजन असते. हे सन २०१४ पासून सुरू आहे. सदरहू काकडा विश्वासराव रामराव मोरे यांनी सुरू केला असून, आता (२०२० साली) श्रीरामजी जाधव, जनार्दन चिभडे हे दररोज काकडारतीचे भजन म्हणतात.

अखंड हरिनाम सप्ताह

येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्व गावकरी वर्गणी करून वारकरी सांप्रदायिक पद्धतीने फार मोठा अखंड हरिनाम सप्ताह करतात. सप्ताह साजरा करण्याची सुरुवातही नेमकी कोणत्या वर्षी झाली हे माहीत नसल्याने, कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत सप्ताहाचा वर्षक्रमांक लिहिला जात नाही.

गुगल नकाशा मानचित्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सप्ताहातील दैनिक कार्यक्रम

सकाळी ४ ते ६ काकडा

सकाळी ६ ते ६:२५ दैनिक नित्यनेमाची आरती

सकाळी ६:३० ते ११ पर्यंत ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण

दुपारी १२:ते २ तुकाराम गाथा भजन

दुपारी २ ते ५ भोजन (सर्व गाव सात दिवस दिवसातून एक वेळ जेवण करते, म्हणजे एकभुक्त राहते.)

सायं ५ ते ६ ज्ञानेश्वरीवर प्रवचन

सायं ६ ते ७:३० पर्यंत हरिपाठ (सामूहिकरीत्या)

रात्रौ ९ ते ११ हरिकीर्तन

असा अखंड हरिनाम सप्ताहा मधील दैनिक विधी असतो.

महाआरती

हनुमान जयंतीला होणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गावातले बाहेरगावी गेलेले लोकसुद्धा गावी येतात व महाप्रसाद घेतात. विवाहित मुलीबाळीसुद्धा येतात.

महादेव मंदिर

महादेवाचे मंदिर हे गावाबाहेर दक्षिणेस रिसोड-लोणार रोडवर आहे. हे मंदिर दगडी असून त्यात काळ्या पाषाणाचे मध्यम आकाराचे शिवलिंग आहे. या मंदिरात दरवर्षी गावातले 'महादेव सेवा मंडळ' गावकऱ्यांच्या सहकार्याने महाशिवरात्रीला महाप्रसादाचे वाटप करते.

गुगल नकाशा मानचित्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वाघाई माता मंदिर

पूर्वी या गावी हे मंदिर गावाच्या उत्तरेस झोपडपट्टीला लागून होते. तेथे वाघाई माता या नावाची एक पाषाणाची मूर्ती असून ती उघड्यावर आहे.

पूर्वी पोळ्याच्या दुसऱ्या (कर )दिवशी तेथे बैलांची पळविण्याची शर्यत लावली जायची.

मरी आई मंदिर

मरी आईचे मंदिर हे गावात हनुमंताच्या मंदिराला लागून असून मोठा वटा (चौथरा) असून उघड्यावर आहे.

जाळवनातील महादेव मंदिर

जाळवणातील महादेव मंदिर हे पूर्वी अतिशय घनदाट जंगलात होते. तेथे शिवारातील लोक दर्शनाला येत असतात. तेथे दरवर्षी काशीराम जी मवाळ हे गोडभात व कढीचा प्रसाद करतात.

सन २०१६मध्ये महादेव मंदिराचा जीर्णोद्धार भिकाजी पाटील मोरे यांच्या पुढाकाराने करण्यात आला असून उंच मंदिर बाधण्यात आले.

गुगल नकाशा मानचित्र पाहण्यासाठी येथे क्लिक क

गांवात आतापर्यंत कीर्तने केलेल्या महाराज मंडळीची नांवे.

ह.भ.प. वै, हरिहर महाराज

ह.भ.प. वै, मातमोळचे महाराज

ह.भ.प. वै, पहूरचे महाराज (तात्या)

ह.भ.प. वै,

ह.भ.प. वै,

ह.भ.प. वै, केळे महाराज.

ह.भ.प. वै, माधव महाराज मगर सुरजखेडा

ह.भ.प. वै. विठ्ठल बुवा चौधरी (अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची)

ह.भ.प. वै. मधुकर बुवा शिंपी (अध्यापक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची)

ह.भ.प. वै. सोपानकाका टाले (खुडज)

ह.भ.प. दत्तात्रय बाबा घोळवे (वैष्णव आश्रम वाशीम)

ह.भ.प. सौ. घोळवे आई (वैष्णव आश्रम वाशीम)

ह.भ.प. सिताराम महाराज खानझोडे (आसेगांव पेन)

ह.भ.प. दादाराव महाराज कऱ्हाळे (दिग्रस कऱ्हाळे)

ह.भ.प. विठ्ठल महाराज कुल्लाळ (आजीसपूर)

ह.भ.प. सारंगधर महाराज इडोळीकर

ह.भ.प. पांडुरंग महाराज सरकटे (समगा)

ह.भ.प. रामकृष्ण महाराज हाडे (गुरुजी) लोणार

ह.भ.प. सरकटे गुरुजी (लोणार)

ह.भ.प. धनंजय महाराज मोरे (B.A./D.J./D.I.T.)

ह.भ.प. गोरक्षनाथ महाराज कासार (मांगवाडी)

ह.भ.प. मदन महाराज बिल्लारी (हराळ)

ह.भ.प. नंदकिशोर महाराज बाजड (नेतंसा)

ह.भ.प. गंगाधर महाराज मुंढे (सावरगाव)

ह.भ.प. डॉ. विठ्ठल महाराज देशमुख (लिंगा)

ह.भ.प. भिकाजी महाराज कोकाटे (मोरगव्हाण)

ह.भ.प. रामकृष्ण महाराज सरकटे (हराळ)

ह.भ.प. केशव महाराज वाळके (मांगवाडी)

ह.भ.प. रामकृष्ण महाराज मोरे (वीर सावंगी)

ह.भ.प. जनाबाई महाराज डोंगरे (बोरखेडी)

ह.भ.प. दत्ता महाराज कुरुन्देकर (कुरुंदा)

ह.भ.प. सोपान महाराज वाळके (मांगवाडी)

ह.भ.प. वेणूताई महाराज वाळके (मांगवाडी)

ह.भ.प. संगीताताई महाराज जिरवणकर (रिसोड)

ह.भ.प. शालिनीताई महाराज (नरसी नामदेव)

ह.भ.प. गोपाल महाराज गायवाळ (आळंदी)

ह.भ.प. दिनकर महाराज जायभाये (भर)

शैक्षणिक

अंगणवाडी,

बालवाडी

जिल्हा परिषदेची प्राथमिक मराठी शाळा

गावांत ५ व्या तुकडी पर्यंत जिल्हा परिषदची शाळा आहे. ही शाळा पूर्वी गावाच्या दक्षिणेस अगदी रोडवर होती, परंतु नवीन शाळेला जागा गावाच्या ईशान्य दिशेस गावठाणातील सरकारी जागा उपलब्ध करून त्यात १०१२ पासून नवीन इमारती सध्या शाळा भरविल्या जाते.

शाळेचा गुगल मानचित्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

----------------------------------------------------------------------------------------------

मांगवाडीतून निघणाऱ्या दिंड्या

गजानन महाराजांची दिंडी

शेगावला जाणाऱ्या या दिंडीची सुरुवात सन १९९० मध्ये झाली.

हि दिंडी दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे (भाद्रपद वद्द प्रतिपदा) गावातून वारकरी सांप्रदायिक पद्धतीने भजनी मंडळीच्या वतीने नियोजीत केल्या जाते.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी

२००६ पासून मांगवाडी येथून दिंडीबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला जाते. ही पालखी ह.भ.प. धनंजय महाराज मोरे यांच्या नेतृत्वात निघत असून साधारण २५ दिवसात ती पंढरपूरला पोचते. दिंडीमध्ये ३०० ते ५०० वारकरी असतात. याच दिंडीला २००८ साली तरडगाव मुक्कामी अपघात होऊन ४ भाविक वारकरी मृत्यमुखी पडले होते. या दिंडीत रिसोड परिसरातील तीनशे ते चारशे लोक सुरुवातीला असतात पंढरपूरमध्ये ही संख्या पाचशेच्या आसपास होत असते या दिंडीमध्ये ह.भ.प. आश्रू म.चव्हाण श्रीराम जाधव साहेब केशव म. वाळके उमेश म.पाआश्रू. पाटील नरवाडे आदिकरून भजनी मंडळी राहत असतात.

२०१७ साली दिन्देचे एक वर्ष पूर्ण झाले आहे.

संत मुंगसाजी महाराज धामणगाव (देव) दिंडी

सदर दिंडी आदिवासी बांधव मांगवाडीहून काढतात. ही दिंडी सन २०१३ पासून निघत असून, ह.भ.प. गोरक्षनाथ महाराज कासार (नाथजोगी) प्रमुख आहेत. या दिंडीत अनेक गावांतील जसे मांगवाडी, गणेशपूर (हत्ता), घोरदडी, केहाळ, कंकरवाडी, मोरगव्हाण, इत्यादी गावांतील भाविकांचा सहभाग असतो. दिंडीत १०० ते २०० वारकरी असतात.

दिंडीचा मार्ग

मांगवाडी, रिसोड, चिखली सरनाईक, आसेगाव पेन, वाशीम, बिटोडा (भोयर), मंगरूळनाथ (पीर), खडी धामणी, चौसाळा, धामणगाव (देव) असा असतो.

महात्मा गांधी तंटामुक्ती समिती

महात्मा गांधी तंटामुक्ती समिती २०१० साली निर्माण झाली

कार्य

महात्मा गांधी तंटामुक्ती समिती ने मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून गावात लाईट लावले आहेत.

पुरस्कार

गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीला महाराष्ट्र शासनाचा "महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार" सन २०१५ - २०१६ मध्ये प्राप्त झाला.

लाभाचे स्वरूप

रुपये दोन लाख रोख आणि सन्मानपत्र.

पदाधिकारी

अध्यक्ष कालावधी उपाध्यक्ष कालवधी सदस्य कालावधी
मधुसूदन घनश्यामदास करवा २०१० ते २०१११
श्रीराम शेषराव वाळके २०११ ते २०१७ चालू...

ग्रामपंचायत स्वरूप व कार्य

स्थापना

मांगवाडीत .... सालापासून ग्रामपंचायत आहे.

कार्य

पदाधिकारी

आत्तापर्यंत झालेले सरपंचउपसरपंच आणि सचिव

सरपंच कालावधी उपसरपंच कालावधी सचिव कालावधी
रतनलाल शंकरलाल करवा बळीराम सयाजी आरगडे
रमेशचंद्र शिवनारायण करवा बळीराम सयाजी आरगडे
तुकाराम कडूजी वाळके
मधुसूदन घनश्यामदास करवा सौ. लिलाबाई दत्तराव पौळ
नंदाबाई आत्माराम वाळके
आश्रू नामदेव चिभडे
रामेश्वर विक्रमा वाळके
गजानन नारायण वाळके
नामदेव विठोबा देव्हारे
रामेश्वर लक्ष्मण चिभडे
माधव नारायण पौळ सौ. कलावती उत्तम गव्हाणे
09 ऑक्टोबर २०१७ चीनिर्वाचितनवीन ग्रामपंचायत सरपंचसदस्य
संपूर्ण नांव पद निवडून येण्याची तारीख
शोभा प्रल्हाद गायकवाड सरपंच 09 ऑक्टोबर २०१७
शांतीराम तुकाराम पौळ सदस्य
जिजाबाई अंबादास वाळके सदस्य
मिनाक्षी संजय देव्हारे सदस्य
नामदेव विठोबा देव्हारे सदस्य
सावित्री महादेव खेलबाडे सदस्य
विष्णू शेषराव चीभडे सदस्य
विठ्ठल विष्णू कांबळे सदस्य
रेखा प्रभू वाळके सदस्य
शारदा केशव तनपुरे सदस्य

साभार : दैनिक लोकमत १०/१०/२०१७ पान हलो वाशिम ३

व्यक्ती विशेष

गावांत जन्म झालेले लोक ज्यांनी गावाचे नांव मोठे केले असे काही लोक.

उद्योगपती

सेठ गोवर्धनदास करवा

वै. गोवर्धनदास करवा यांनी अनेक उद्योग काढले. दालमिल, जिनिंग, आडत, असे उद्योग काढले. त्या मुळे अनेकांना रोजगार मिळाला.

त्याच बरोबर तालुक्याच्या ठिकाणी रिसोड नगराध्यक्ष या पदावर ते काही काळ विराजमान होते.

किर्तनकार व्यक्ती

  1. धनंजय महाराज मोरे
  2. गोरक्षनाथ महाराज कासार (प्रसिद्ध पोथी वाचक)
  3. सोपान महाराज वाळके
  4. वेणूताई महाराज वाळके
  5. गोपाल महाराज गायवाळ

पुरस्कार प्राप्त व्यक्ती

बायडाबाई नामदेव कांबळे यांना ........साली महाराष्ट्र शासनाचा आण्णाभाऊ साठे पुरस्कार मुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळाला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक यांना पुरस्कार देण्यात येतो. ही योजना दि. १९ जुलै १९९७ पासून कार्यान्वित आहे.

लाभाचे स्वरूप [संपादन]

२५ व्यक्ती व ६ संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. संस्थांना प्रत्येकी ५०,००० रुपये, शाल व श्रीफळ तर प्रत्येक व्यक्तीस २५,००० रुपये, शाल व श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, खण व सपन्तिक गौरव. एक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस मार्फत एस टी बस प्रवास सवलत.

सरकारी / निमसरकारी व केंद्रीय कर्मचारी (वयानुसार)

नांव नोकरी ठिकाण
वै. गोकुळदास चोटिया मयत
वै. रामजी अमृता वाळके शिक्षक मयत
वै. नारायण ग्यानुजी पौळ तलाठी मयत
सुभाषचंद्र चोटिया भूगर्भ जलतज्ज्ञ
मारोती कांबळे
त्र्यंबक कांबळे
नथ्थूजी महादजी कोरडे गटसचिव सेवानिवृत्त
प्रल्हाद नारायण भारती अभियंता कारंजा लाड
अर्जुन नामदेव पौळ गटसचिव रिसोड
सुखदेव गोविंदा कांबळे शिक्षक सेवानिवृत्त
प्रल्हाद गोविंदा कांबळे मिलिट्री ऑफिसर जम्मू
दिनकर गोविंदा कांबळे J.J. HOSPITAL MUMBAI मुंबई
गजानन भिकाजी पवार (तहसील कार्यालय) लिपिक वाशीम
आत्माराम गोविंदा कांबळे लिपिक रिसोड
भगवान नामदेव मोरे गटसचिव रिसोड
भिकाजी बळीराम वाळके MSRTC रिसोड
शिवगिर सखाराम गिरी शिक्षक सिंदखेड राजा
सुधीर सुखदेव कांबळे शिक्षक मेहकर
संजय भिकाजी पवार MSRTC रिसोड
रामदास मोधे पंचायत समिती रिसोड
शेषराव श्रीरंग घंदारे लिपिक कंकरवाडी
नारायण दौलत कोकाटे मिलिट्रीमन जम्मू
रवि दीपक चाटे महाबीज अकोला अकोला

गावांत हे नाही

नांव आहे/नाही
मोबाईल टॉवर जिओ तयार झाले चालू नाही
मेडिकल नाही
डॉक्टर नाही
हॉटेल नाही
दुचाकी गॅरेज नाही
चार चाकी गॅरेज नाही
लॉंड्री नाही
गुरव नाही
गणपती मंदिर नाही
रुग्णवाहिका नाही
हायस्कूल नाही
मुसलमान नाही

असा व्यक्ती गावात अजून झाला नाही.

आमदार झाला नाही
खासदार झाला नाही
मंत्री झाला नाही
वकील झाला नाही
हार्डवेर इंजिनिअर झाला नाही
केमिकल इंजिनिअर झाला नाही
सिव्हील इंजिनिअर झाला नाही
मॅकनिकल इंजिनिअर झाला नाही
अकौंटंट झाला नाही
पॅथॉलॉजिस्ट झाला नाही
प्राचार्य झाला नाही
पॉलिहाऊस शेतकरी झाला नाही

भौगोलिक स्थान

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/

संदर्भ

https://www.youtube.com/watch?v=f3_W3Qymvu0