Jump to content

माँटेग्यू जॉर्ज नॉर्थ स्टॉपफोर्ड

जनरल सर मॉंटेग्यू जॉर्ज नॉर्थ स्टॉपफोर्ड (१६ नोव्हेंबर, इ.स. १८९२:हॅनोव्हर स्क्वेर, लंडन, इंग्लंड - १० मार्च, इ.स. १९७१) हा ब्रिटिश सैन्याधिकारी होता. याने कोहिमाच्या लढाईत ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व केले होते.

स्टॉपफोर्ड पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस लेफ्टनंट पदावर रुजू झाला. युद्धाच्या शेवटी हा मेजर पदावर होता. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६-४७ दरम्यान हा ब्रिटिश सैन्याच्या आग्नेय आशिया कमानीचा सरसेनापती होता. दुसऱ्या महायुद्धात, विशेषतः इंफाळ आणि कोहिमाच्या लढायांमध्ये ब्रिटिश सैन्याचे विजयी नेतृत्व केल्याबद्दल त्यास अनेक सन्मान मिळाले.