माँटाना
माँटाना Montana | |||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||
| |||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||
राजधानी | हेलेना | ||||||||
मोठे शहर | बिलिंग्स | ||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ४वा क्रमांक | ||||||||
- एकूण | ३,८१,१५६ किमी² | ||||||||
- रुंदी | १,०१५ किमी | ||||||||
- लांबी | ४१० किमी | ||||||||
- % पाणी | १३.५ | ||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ४४वा क्रमांक | ||||||||
- एकूण | ९,८९,४१५ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||
- लोकसंख्या घनता | २.५१/किमी² (अमेरिकेत ४८वा क्रमांक) | ||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | ८ नोव्हेंबर १८८९ (४१वा क्रमांक) | ||||||||
संक्षेप | US-MT | ||||||||
संकेतस्थळ | www.mt.gov |
माँटाना (इंग्लिश: Montana) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर भागात कॅनडाच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे. माँटाना हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील चौथे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४४व्या क्रमांकाचे राज्य आहे.
माँटानाच्या उत्तरेला कॅनडाचे आल्बर्टा व सास्काचेवान हे प्रांत, वायव्येला ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत, पश्चिमेला आयडाहो, पूर्वेला नॉर्थ डकोटा व साउथ डकोटा तर दक्षिणेला वायोमिंग ही राज्ये आहेत. हेलेना ही मोंटानाची राजधानी असून बिलिंग्स हे सर्वात मोठे शहर आहे.
इथली स्थानिक वेळ UTCच्या ७ तास मागे असते म्हणजे भारताच्या प्रमाणवेळेपेक्षा साडेबारा तास मागे आहे. हा अमेरिकेतला माउन्टन टाइम आहे. हिवाळ्यात, दिवसाच्या प्रकाशात कामे करता यावीत म्हणून घड्याळे एक तास पुढे करतात.
चित्रदालन
- ग्लेशियर राष्ट्रीय उद्यान
- मिसूरी ब्रेक्स
- ग्लेशियर राष्ट्रीय उद्यान
- बिग स्काय रिसॉर्ट