Jump to content

महोबा

महोबा
उत्तर प्रदेशमधील शहर
महोबा is located in उत्तर प्रदेश
महोबा
महोबा
महोबाचे उत्तर प्रदेशमधील स्थान
महोबा is located in भारत
महोबा
महोबा
महोबाचे भारतमधील स्थान

गुणक: 25°17′24″N 79°52′22″E / 25.29000°N 79.87278°E / 25.29000; 79.87278

देशभारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा महोबा जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ९५,२१६[]
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


महोबा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक ऐतिहासिक शहर व महोबा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. महोबा शहर उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात स्थित असून ते कानपूरच्या १५० किमी दक्षिणेस तर अलाहाबादच्या २४० किमी पश्चिमेस आहे.

महोबा हे ऐतिहासिक चंदेल्ल घराण्याचे मुख्यालय होते. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ खजुराहो येथून जवळच आहे.

वाहतूक

महोबा भारतीय रेल्वेच्या झाशी-अलाहाबाद रेल्वेमार्गावर असून बुंदेलखंड एक्सप्रेस, उत्तर प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचे येथे थांबे आहेत. महोबा-खजुराहो रेल्वेमार्ग २००८ साली चालू झाल्यामुळे महोबाला जंक्शनचा दर्जा मिळाला आहे.

संदर्भ आणि नोंदी