महिमानगड
महिमानगड | |
नाव | महिमानगड |
उंची | ३२०० फूट् |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | सातारा, महाराष्ट्र |
जवळचे गाव | महिमानगड गाव,पिंगळी बु,दहिवडी,शिद्रिबुद्रुक,पुसेगाव. |
डोंगररांग | सातारा - फलटण |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
महिमानगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे.
इतिहासाला माहीत नाही हा किल्ला किती जुना आहे पण राष्ट्रकुट,चालुक्य,यादव,इस्लामी राजवटी, मान देश ज्यांना आदिलशहा आणि मुघल यांचेकडून वतन मिळाले होते ते माण (मान)चे माने या सर्व राजवटी मध्ये महिमान गड किल्ला अस्तित्वात असावा एवढा तो जुना मात्र आहे आणि राष्ट्रकुट, यादव राजवटी मध्ये तो होता असा तर्क लावला जाऊ शकतो असा ही आहे हे त्याचे जीर्ण झालेले दगड पाहूनच समजते.इतिहास संशोधक, पुरातत्त्व खाते आणि सरकारने या किल्ल्यावर उत्खनन करून माहिती मिळवल्यास अभ्यास करून पुनर्बांधणी केल्यास महाराष्ट्राला राष्ट्रकुट,यादव यांचा खरा इतिहास समजण्यासाठी मदतच होईल आणि किल्ला ही पर्यटन दृष्टीने विकसित होईल. महिमान गड हा किल्ला राष्ट्रकूट यांचा मुख्य गड असण्याची शक्यता आहे कारण राष्ट्रकूट यांची राजधानी मान्यखेत होती.मल्यखेत म्हणजेच मलवडी आणि मान्य खेत म्हणजे माण देश असण्याची श्यक्यता इतिहास संशोधक वर्तवत असतात आणि याच माण देशावर राज्य करणारे ते माने असा माण, महिमान आणि माने यांचा संबंध आहे. माण देशातील महिमा असलेला असा माण गड म्हणजे महिमा+महान अपभ्रंश होऊन मही+मान गड किंवा महि म्हणजे महेश,महिपती, महादेव यांचा माण ज्या राष्ट्रकूट राज्यांची कीर्ती म्हणजे महिमा महान आहे असा तो मान्य खेतचा महिमा महान गड जो आज महिमान गड हा महिमान गड म्हणजेच आणि माण या शब्दांचा संबंध आहे. ज्याच्या अवती भोवती माण नदी वाहते ती महि माण गडची माण नदी.. महिमान गड हा. शब्द महिमा + माण या शब्दा पासून आहे मेहमान पासून नव्हे. देवगिरीचे यादव काळात यादव लोक हे महादेव यांचे उपासक होतेत आजही यादव लोकांचे कुलदैवत महादेव हेच आहे हा किल्ला आणि प्रदेश दीर्घ काळ यादव घराण्याकडे होता आणि सिंघण याने मायणी आणि सिंगणापुर येथे मंदिरे बांधली आहेत.देवगिरी जसा दौलताबाद झाला तसा महिमा+माण किल्ला परकीय इस्लामी राजवटी मध्ये त्यांचे आक्रमणं झाले नंतर महि माण किल्ला याला फारशी मेहमान असा अपभ्रंश (पाहुणा)गड केला आणि त्याचा आता फारशी संस्कृत व्याकरण मिश्रित अपभ्रंश महिमान झाला.महिमा म्हणजे कीर्ती आणि मान सन्मान कीर्ती आणि मान दोन्ही आहे असा तो मही+मान जो महीमाण असा लिहला गेला पाहिजे जो माण तालुक्याची पूर्वी पासून ओळख आहे म्हणजे माण देशातील कीर्ती, महिमा असलेला किल्ला म्हणजे महिमान आणि महादेव डोंगर रांगेत असलेला महिपती किंवा महेश यांचा माण बिंदू असलेला तो महि+ माण.हिन्दी मध्ये जसे पाणी हा शब्द पानी असा लिहतात तेच इथे पण माण हा शब्द मान असा लिहला जात आहे त्यात बदल करण्यात आला पाहिजे आणि ज्या किल्याचा महिमा महान असा तो महिमान गड महिमा माण म्हणजे महिमाण गड हे नाव दिले पाहिजे. कोकणात एक माण गड आहे आणि नावात साधर्म्य नको म्हणून महादेव डोंगर रांगेतील माण गड म्हणजे महिमाण गड या किल्ला आणि नदीचे नावावरून याला माण देश हे नाव पडले आहे आणि मान्य खेत् दुसरे तिसरे कुठलेही नसून ते माण गड हेच असावे.
किल्ले पडके,राजवाडे पडके,मंदिर पडकी सर्व पुरातन वास्तू शिल्प पडकी आहेत महाराष्ट्रात. कारण सरकार पडकी असतात आणि मोडकी ही असतात. बाहेरच्या देशात त्यांच्या पुरातन वास्तू जतन करून ठेवल्या जातात आणि पर्यटन, संशोधक या साठी वापर होतो. आमचे येथे एका ही पडक्या वास्तूची पूर्ण माहिती आहे असे एक ही ठिकाण नाही आणि वास्तू नाही.दुनिया मध्ये त्यांच्या वास्तू जतन करून, ऐतिहासिक जसी होती तशी ठेवतात नसेल तर त्याचा अभ्यास करून जसी होती तशी वास्तू उभी करतात,करण्याचा प्रयत्न करतात आणि जगापुढे आपला इतिहास ओळख निर्माण करतात आणि आमची लोक, सरकार आणि पुरातत्त्व खाते काही देणं घेणं नसल्यासारखे दुर्लक्ष करतात.अश्या हजारो वास्तू,किल्ले हजारो गावात आहेत.आमची सरकार आणि लोक आणि पुरातत्त्व खाते पडके आणि मोडके आहेत.
भौगोलिक स्थान
महिमानगड किल्ला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आहे. माण तालुका हा साताऱ्याच्या पुर्व भागातील तालुका आहे. सातारा पुसेगाव म्हसवड असा गाडीमार्ग आहे. या गाडीमार्गावर साताऱ्यापासून ५० कि.मी. अंतरावर महिमानगड हा किल्ला एका लहानशा टेकडीवर बांधलेला आहे.
महिमानगडाच्या दक्षिण पायथ्याला उकीर्डे नावाचे गाव आहे. तर उत्तर पायथ्याला महिमानगड वाडी आहे. उकीर्डेकडूनही गडावर जाता येते. अर्थात ही वाट नेहमीची चढाईची नाही. काहीशी अवघड असून ती तुटक्या तटबंदीमधून गडात शिरते.
महिमानगडाच्या फाट्यापासून गडाचा पायथा असलेल्या वाडीपर्यंत गाडीमार्ग आहे. या मार्गाने जाताना महिमानगडाची पश्चिम अंगाची तटबंदी सुरेख दिसते. महिमानगडवाडी किल्ल्याच्या उतारावरच वसलेली आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
वाडीतील मंदिरापासून एक वाट गडावर जाते. या वाटेवरून गडाच्या दरवाजाचे बुरुज दिसतात. वळणावळणाने ही वाट दरवाजापर्यंत जाते. या वाडीतील जनावरे अनेकदा गडावर चरायला नेतात. त्यामुळे अनेक ढोरवाटा तयार झालेल्या आहेत.
या वाटेने वर चढत असताना डावीकडे तटबंदीच्या खाली कपारीत पाण्याची टाकी कोरलेली आहे. पैकी एकात झाडी गच्च माजलेली असून दुसरे गाळाने पूर्ण भरले आहे. तिसऱ्यात मात्र स्वच्छ पाण्याचा झरा आहे. येथून खडकावरून चढून आपण गडाच्या मुळे वाटेवर येवू शकतो. येथून गडात शिरणारा मार्ग दिसतो. तो उत्तरेकडून असला तरी तो वळवून आत घेतला आहे. आत मधे दरवाजा पुर्वाभिमुख बांधलेला होता.
येथील तटबंदीवर एक झाड वाढलेले आहे. झाडाच्या असंख्य मुळ्यांनी तटबंदीला चांगलेच जखडले आहे. अर्थात हे दृष्य अनेक ठिकाणी पहायला मिळते. पण महिमानगडाच्या या झाडाची तऱ्हाच काही और आहे. हे झाड उभे वाढलेले नाही तर आडवे वाढले आहे. ते जमिनीला समांतर असे चाळीस पन्नास फूट पुढे आले आहे. त्याचे वजन त्या तटबंदीने कसे पेलले याचे आश्चर्य वाटते.
महिमानगडाच्या दरवाजाची कमान ढासळून नष्ट झाली आहे. कमानीच्या बाजूचे उभे खांब मात्र अजून तग धरून आहेत. सुबक घडीव दगडाच्या या खांबांच्या खालच्या बाजूला देखणे असे हत्ती कोरलेले आहेत. कोणीतरी तिथली दगडमाती काढल्यामुळे हे हत्ती दिसू लागले आहेत. दरवाजाच्या समोर वळणदार भिंत अणि पुढे बुरुज बांधून त्याला शत्रूपासून संरक्षण दिलेले होते, असे गोमुखी पद्धतीचे बांधकाम ही शिवकालीन बांधकामाचे वैशिष्ठ होते.
शत्रूपासून नाही पण काळाच्या ओघात नष्ट झालेला हा देखणा दरवाजा ओलांडून आपण गडामधे प्रवेश करतो. डावीकडील वाट गडाच्या माथ्यावर जाते. तर समोरची वाट तटबंदीकडे जाते. या वाटेने तटबंदीच्या आतून गडाला फेरी मारता येते. तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली असल्यामुळे काळजीपुर्वकच फिरणे आवश्यक आहे. तटबंदीला जागोजाग बुरुज आहेत. गडाचा पश्चिम भाग रुंद असून तो पुर्वेकडे निमुळता होत गेलेला आहे. पुर्वेकडील निमुळत्या टोकावर टेहाळणीसाठी बुरुज आहे. हा निमुळता भाग मधेच तटबंदी बांधून गडापासून वेगळा राखला आहे. या तटबंदीमध्ये दोन दिंडीदरवाजे आहेत. त्यातील उत्तरेकडील दिंडी दरवाजा दगडी ढासळल्याने बंद आहे.
गडाच्या माथ्यावरून आपल्याला मोठा मुलूख दिसतो. भूषणगड, वर्धनगड हे किल्ले तसेच जरंडेश्वराचा डोंगर ही दिसतो. महिमानगडाच्या माथ्यावर घरांचे अवशेष एक कबर. एक हनुमानाचे मंदिर तसेच किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष पहायला मिळतात.
या माथ्याच्या उतारावर पाण्याचे टाके आहे. खडकात खोदून नंतर ते चिरेबंदी दगडांनी बांधून काढलेले आहे. असे टाके इतर किल्ल्यांवर आढळत नाही. अर्थात हे टाके पुर्वी बुजलेले होते.