महिपती ताहराबादकर
संत महिपती (मराठी लेखनभेद: महिपती ताहराबादकर) (अंदाजे शा.श. १६३७ / इ.स. १७१५ - श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ / इ.स. १७९०) हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे होऊन गेलेले संतकवी होते. त्यांनी १३व्या ते १७व्या शतकादरम्यानच्या महाराष्ट्रातील प्रमुख वैष्णव संताबाबतचे चरित्रलेखन केले.[१] [२] [३]
जीवन
बालपण
ताहराबाद हे गाव सतराव्या शतकात ताहीरखान नावाच्या सरदाराची जहागीर होते. त्याच्या पदरी असलेले श्री दादोपंत कांबळे हे देशस्थ ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राम्हण, गावचे कुलकर्णी व ग्रामजोशी या पदांचे वतन सांभाळीत होते. त्यांच्या घरात फारच उशीरा, म्हणजे त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षी, शा.श. १६३७ (इ.स. १७१५) साली महिपतींचा जन्म झाला. श्री दादोपंत कांबळे हे मूळचे मंगळवेढ्याचे होते.
गृहस्थाश्रम
वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच महिपती हे वंशपरंपरेने चालत आलेले ताहराबादचे कुळकर्णीपद व जोसपण सांभाळू लागले. परंतु त्यांचे चित्त मात्र आध्यात्मिक साधनेतच होते. त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई असे होते. तिच्यापासून त्यांना विठ्ठल व नारायण असे दोघे पुत्र झाले.
मृत्यू व समाधिस्थळ
महिपतीबुवा श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ (इ.स. १७९०) रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निवर्तले. ताहराबाद येथे बुवांचे राहते घर अजून उभे आहे. तेथेच त्यांचे विठ्ठल मंदिरही आहे. तेथून जवळच त्यांच्या समाधीचे वृंदावनही आहे.
कार्य
ते काही काळ अहमदनगर जिल्ह्याच्या ताहराबाद येथे वास्तव्यास होते.त्यांनी वारकरी संतांबाबतही चरित्रलेखन केले. त्याच्या भक्तविजय या सन १७६२या दरम्यान लिहिलेल्या ग्रंथाचे भाषांतर सन १९३३ मध्ये प्रसिद्ध झाले. महिपती यांनी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक संतांचा काव्यमय परिचय 'भक्त विजय' व `संतलीलामृत' या ग्रंथांत शब्दबद्ध केला आहे. संत साहित्यातील अभ्यासकांच्या लेखी संत महिपती महाराजांच्या रचनेला विशेष स्थान आहे. महिपती महाराजांच्या चरित्राचा परिचय ह.भ.प. विनायक महाराज शाळिग्राम समशेरपूरकर (संगमनेर) यांनी त्यांच्या 'नूतन संत चरित्र' या ग्रंथात नऊ ते पंधरा अध्यायांत दिलेला आहे. महिपती महाराज वैकुंठवासी होऊन २१५ वर्षे झालेली आहेत.
संत महिपती बुवा संत चरित्रकार होते परंतु ते संत चरित्र सुस्वर संगीत ताला वर गायन करीत व भक्तांचा प्रचार करीत. या विषया वर ऑक्सफ़ोर्ड संदर्भ सेवा अंतर्गत इंग्लिश लेख प्रकाशित आहे.
https://www.oxfordreference.com/view/10.1093/oi/authority.20110803100126761
साहित्य संपदा
ग्रंथाचे नाव अध्याय ओव्या रचना शक
साहित्यकृती | अध्याय | ओव्या | रचनाकाळ |
---|---|---|---|
श्रीभक्तविजय | ५७ | ९९१६ | १६८४ |
श्रीकथासरामृत | १२ | ७२०० | १६८७ |
श्रीसंतलीलामृत | ३५ | ५२५९ | १६८९ |
श्रीभक्तलीलामृत | ५१ | १०७९४ | १६९६ |
श्रीसंतविजय | २६ (अपूर्ण) | ४६२८ | १६९६ |
श्रीपंढरी माहात्म्य | १२ | - | - |
श्रीअनंतव्रतकथा | - | १८६ | - |
श्रीदत्तात्रेय जन्म | - | ११२ | - |
श्रीतुलसी माहात्म्य | ५ | ७६३ | - |
श्रीगणेशपुराण | ४ (अपूर्ण) | ३०४ | - |
श्रीपांडुरंग स्तोत्र | - | १०८ | - |
श्रीमुक्ताभरण व्रत | - | १०१ | - |
श्रीऋषीपंचमी व्रत | - | १४२ | - |
अपराध निवेदन स्तोत्र | - | १०१ | - |
स्फुट अभंग व पदे | - | - | - |
या ग्रंथांची एकूण ओवीसंख्या चाळीस हजाराचे आसपास आहे.[४]
जागतिक ऑनलाइन लायब्ररी कॅटलॉग मध्ये संत महिपती महाराज यांची ग्रंथ संपदा व नोंदी"
ओसीएलसी (ऑनलाइन संगणक ग्रंथालय केंद्र) ऑनलाइन कॅटलॉग,
हा जगातील सर्वात मोठा ग्रंथसूची डेटाबेस आहे.
ऑनलाइन जागतिक ग्रंथालयात संत महिपती महाराज यांच्या भक्ती साहित्यावर उपलब्ध इंग्रजी,मराठी,हिंदी व इतर भाषेतील ग्रंथ सूची नोंद व लिंक देण्यात आली आहे.
महापती 1715-1790
Mahīpati 1715-1790 Overview Works: 70 works in 195 publications in 4 languages and 895 library holdings
Genres: Biographies Legends Poetry
Roles: Author, Editor
Classifications: PK2404, 891.46
Most widely held works by Mahīpati The life of Eknāth = Śrī Eknāth charitra by Mahīpati( Book )
26 editions published between 1846 and 1993 in English and Marathi and held by 160 WorldCat member libraries worldwide Stories of Indian saints : translation of Mahipati's Marathi Bhaktavijaya by Mahīpati( Book )
27 editions published between 1806 and 2014 in 3 languages and held by 112 WorldCat member libraries worldwide Eknath : a translation from the Bhaktalilamrita by Mahīpati( Book )
7 editions published in 1927 in English and held by 77 WorldCat member libraries worldwide Tukaram; translation from Mahipati's Bhaktalilamrita, chapters 25-40 by Mahīpati( Book )
5 editions published in 1930 in English and held by 74 WorldCat member libraries worldwide Bhanudas; translated from Mahipati's Bhaktavijaya, chapters 42 & 43, with Marathi text in appendix by Mahīpati( Book )
8 editions published between 1926 and 1930 in English and held by 73 WorldCat member libraries worldwide Rāmdās, translation of Mahipati's Santavijaya by Mahīpati( Book )
5 editions published in 1932 in English and held by 53 WorldCat member libraries worldwide Stories of Indian saints : an English translation of Mahipati's Marathi Bhaktavijaya by Mahīpati( Book )
12 editions published between 1933 and 1982 in English and held by 43 WorldCat member libraries worldwide Tales of the saints of Pandharpur by Mahīpati( Book )
5 editions published between 1919 and 1927 in English and held by 39 WorldCat member libraries worldwide Nectar from Indian Saints; an English translation of Mahīpati's Marāthī Bhaktalīlāmrit, chapters 1-12, 41-51 by Mahīpati( Book )
7 editions published in 1935 in English and held by 34 WorldCat member libraries worldwide Indian saints by Mahīpati( Book )
5 editions published in 1988 in English and held by 27 WorldCat member libraries worldwide Life of Tukaram by Mahīpati( Book )
7 editions published between 1980 and 1986 in English and held by 20 WorldCat member libraries worldwide Śrībhakta vijaya by Mahīpati( Book )
2 editions published in 1974 in Marathi and Hindi and held by 15 WorldCat member libraries worldwide
Verse hagiographies of Hindu saints Bhanudas, the poet-saint of Maharashtra : translation from the Bhaktivijaya by Mahīpati( Book )
1 edition published in 1996 in English and held by 14 WorldCat member libraries worldwide Rāmdās by Mahīpati( Book )
3 editions published in 1932 in English and Undetermined and held by 10 WorldCat member libraries worldwide Stories of Indian saints by Mahīpati( Book )
7 editions published between 1982 and 1996 in English and held by 10 WorldCat member libraries worldwide Santāñcyā caritrakathā; prācīna marāṭhīntīla santacaritrapara vāṅmayācẽ darśana by Mahīpati( Book )
2 editions published in 1967 in Marathi and held by 10 WorldCat member libraries worldwide Śrī Paktavijayuttuḷ on̲r̲ākiya Śrīmat-Tukkārām Svāmikaḷ carittiram : Śrīharināma Stōttirappā saṅkīrttan̲am by Mahīpati( )
2 editions published in 1911 in Tamil and held by 10 WorldCat member libraries worldwide Sri Bhaktivijaya [57 lives of the Marathi poet saints by Mahīpati( )
2 editions published in 1904 in Marathi and held by 9 WorldCat member libraries worldwide Tukaram : the poet saint of Maharashtra by Mahīpati( Book )
2 editions published in 1996 in English and held by 9 WorldCat member libraries worldwide Santāñcyā caritrakathā by Mahīpati( Book )
3 editions published in 1967 in Marathi and held by 9 WorldCat member libraries worldwide
(संकलन- विजय प्रभाकर नगरकर,ताहाराबादकर ) http://www.worldcat.org/identities/lccn-n83046237/
इतर
संत महिपती विशेषांक - पंढरी संदेश
श्रीक्षेत्र पंढरपूर येथुन साप्ताहिक पंढरी संदेशने श्रेष्ठ संत कवी महिपती महाराज जीवन कार्य दर्शन दिपावली विशेषांक 1992 रोजी प्रकाशित केला आहे. श्री गजानन पंढरीनाथ बिडकर यांनी हा विशेषांक श्री गजानन प्रेस,2538,दर्शन मंडप,पंढरपूर येथुन प्रकाशित केला आहे. या अंकात श्रेष्ठ संत कवी महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर विविध 34 लेखकांचे लेख प्रकाशित झाले आहेत. श्री.दा.का.थावरे यांनी संपादकिय लिहिले आहे. ते आपल्या संपादकियात म्हणतात की श्रेष्ठ संत कवी महिपती यांनी महाराष्ट्रावर संतचरित्र लेखनाने महत् उपकार करून ठेवले आहेत.त्यांचे ऋण सतत शिरी वहावे असे आहे. या असंख्यात ओवी लेखनात सदाचार,नीती,धर्म,भक्ति याचा विचार आहे. भक्तिविजय सारख्या त्यांच्या ग्रंथाचे सामुदायिक वाचन खेडोपाडी प्रतिवर्षी होत आहे यात मागील 150 वर्षापासुन खंड नाही. हे ऋण एकदा गौरवावे म्हणुन पंढरी संदेशने त्यांच्या निर्णयशताब्दि निमित्त त्यांचा स्मरण अंक काढला आहे. या विशेषांकात ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलुरकर,नानामहाराज कांबळे, कुमार कोठावळे, भा.प.बहिरट,भीमाशंकर देशपांडे,द.शि.तरलगट्टी, पांडुरंग महाराज ताहराबादकर,ड़ॉ.प्र.न.जोशी, डॉ.म.प.पेठे, पां.ग.हरिदास, स.कृ.देवधर,सौ.सु.द.कुलकर्णी, अनिल देशपांडे, प्र.द.निकते, डॉ.वा.पु.गिंडे,प्र.दि.कुलकर्णी, ग.प.बिडकर यांचे लेख सामाविष्ट केले आहेत.
इ.स.च्या १८व्या शतकातील वारकरीपंथी संतांमध्ये महिपती महाराजांचे नाव अनेक विठ्ठलभक्तांच्या तोंडी असे. पण त्यांचे लेखी चरित्र उपलब्ध नव्हते. मात्र, इ.स. १९९२ साली पंढरपूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या 'पंढरी संदेश' मासिकाने संत महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर खास दिवाळी अंक प्रकाशित केला होता. संतांच्या चरित्रांची विस्तृत माहिती ओवीबद्ध करणाऱ्या महिपती महाराजांचे चरित्र मात्र दुर्लभ होते. पुढे त्यांच्याच वंशातील वयोवृद्ध ज्ञानी कीर्तनकार ह.भ.प. नानामहाराज वनकुटेकर ऊर्फ गोविंद म्हाळसाकांत कांबळे यांनी श्री संत महिपती महाराजांचे एक ८३ पानांचे छोटेखानी चरित्र लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन २ ऑगस्ट, इ.स. २००५ रोजी ताहराबाद(तालुका राहुरी) येथील श्री क्षेत्र महिपती महाराज देवस्थान येथे श्रीमंत आनंद आश्रम स्वामींचे शिष्य डॉ. नारायण महाराज जाधव यांचे हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगरचे कार्याध्यक्ष व कवी श्री. चंद्रकांत पालवे यांनी या चरित्राकरिता विशेष परिश्रम घेऊन संपादन व संकलन केले आहे.
पुणे येथून प्रकाशित मासिक साहित्य चपराक (संपादक- घनश्याम पाटील) यांनी ऑगस्ट, इ.स. २०११ हा अंक संत चरित्रकार महिपती विशेषांक या नावाने प्रसिद्ध केला आहे.
विजय प्रभाकर नगरकर यांनी 'सचित्र संत महिपती ताहराबादकर' पुस्तक पॉन्डिचेरी येथील बुक मीडिया प्रकाशका मार्फत प्रसिद्ध केले आहे. https://www.amazon.in/dp/8194913705/ref=cm_sw_r_cp_apa_glt_fabc_N1A1YYXB5QJ5G5KEKPVG
चित्रदालन
- महिपती आड
- महिपती समाधी
- महिपती देवस्थान
- महिपती पादुका
संदर्भ
- ^ लुटेंन्दोर्फ, फिलिप. Hanuman's tale the messages of a divine monkey. न्यूयॉर्क. p. 75. ISBN 978-0195309225.
- ^ लोचटेफेल्ड, जेम्स जी. The illustrated encyclopedia of Hinduism (1st. ed.). न्यूयॉर्क. p. ४०९.
- ^ नोव्हेट्के, ख्रिश्चन ली. = SQUdRVOv9TUC Religion and Public Memory: A Cultural History of Saint Namdev in India Check
|दुवा=
value (सहाय्य). न्यूयॉर्क चिचेस्टर. p. ५३. ISBN 978-0231-14184-0. - ^ देशपांडे, अ. ना. (१९८८). प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. पुणे: व्हीनस प्रकाशन. pp. ५०.
बाह्य दुवे
- खापरे संकेतस्थळावरील भक्तलीलामृत विदागारातील आवृत्ती
- [http://mahipatikrupa.blogspot.com/2020/08/blog-post.html?m=1
श्री संत महिपती कृपा ब्लॉग]
संत महिपती कृपा ब्लॉग http://mahipatikrupa.blogspot.com/2020/08/blog-post.html?m=1