Jump to content

महाराष्ट्रातील सैनिकी शाळा

महाराष्ट्रात ३९ सैनिकी शाळा आहेत. त्यांपैकी औरंगाबादची सैनिकी सेवापुर्व शिक्षण संस्था (Services Preparatory Institute,SPI) साताऱ्यातील सैनिक स्कूल आणि पुण्याची श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल (SSPMS) या अधिक प्रसिद्ध आहेत. ३९ शाळांपैकी तीन कायम विनाअनुदित असून, पुण्यातली एक शाळा खासगी आहे. मुलींसाठी एकूण तीन सैनिकी शाळा आहेत. ३२ मुलांच्या शाळांना आणि तीन मुलींच्या शाळांना प्रत्येकी १ कोटी ८० लाख रुपये सरकारी अनुदान मिळते. १९९८पासून ते २०१९ सालर्यंत २०० कोटी रुपये अनुदान दिले गेले आहे.

महाराष्ट्रातील जिल्हावार शाळांची नावे

जिल्ह्याचे नाव नाशिक शाळेचे नाव
अहमदनगर१. विखे पाटील शाळा, प्रवरानगर. २. संजीवनी विद्यालय, कोपरगाव
अकोलानॅशनल मिलिटरी स्कूल, गायगाव
अमरावतीदीपशिखा गुरुकुल शाळा, चिखलदरा
उस्मानाबाद तुळजाभवानी शाळा, तुळजापूर
औरंगाबाद १. सर्व्हिसेस प्रिपेरेटरी इन्स्टिट्यूट(SPI). २.इंदिरा गांधी स्कूल, जावडा. ३. राजे संभाजी स्कूल, कांचनवाडी
कोल्हापूरतात्यासहेब कोरे शाळा, विजयनगर (हातकणंगले तालुका)
गडचिरोलीसैनिकी स्कूल, गडचिरोली
गोंदियामनोहरभाई पटेल स्कूल, गोंदिया
चंद्रपूरसन्मित्र विद्यालय, विसापूर
जळगावविजय नाना पाटील स्कूल, जळगाव
जालनामत्स्योदरी सैनिकी स्कूल, जालना
ठाणेभारतीय विद्यालय, घोडबंदर
धुळेश्री छत्रपती शिवाजी सैनिकी शाळा, मोराणे
नंदुरबारगावित सैनिक शाळा, पथराई
नागपूरभोसला मिलिटरी स्कूल, नागपूर
नांदेडशाहू सैनिकी विद्यालय, बिलोली
परभणी१.नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा, परभणी २.पृथ्विराज देशमुख मुलींची सैनीकी शाळा, धर्मापुरी, परभणी
पुणे१. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा. २. श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.
बीडसैनिकी विद्यालय, पिंपळगव्हाण
बुलढाणाराजीव गांधी स्कूल, कोलवड
भंडारावाघाये शाळा, लाखनी
यवतमाळईश्वर देशमुख शाळा, दिग्रस
रत्‍नागिरीसंभाजीराजे स्कूल, जामगे
रायगडकीर्ती विजय आर्मी स्कूल, अलिबाग ?
लातूरशाहू महाराज शाळा, उदगीर
वर्धाइंडियन मिलिटरी स्कूल, पुलगाव
वाशीम यशवंतराव चव्हाण शाळा, सुपखेला
सांगलीदादोजी कोंडदेव सैनिकी शाळा, तासगाव
सिंधुदुर्गसिंधुदुर्ग सैनिकी शाळा, अंबोली
सोलापूरजय जवान जय किसान सैनिकी शाळा, सोलापूर
हिंगोलीसैनिकी विद्यालय, कळमनुरी