Jump to content

महाराष्ट्रातील दिनचर्या

गामीण

पूर्वीचा काळ

महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाची दिनचर्या अगदी रामप्रहरापासून (सूर्योदया पूर्वी) सुरू होत असे.

झोपेतून ऊठताना करदर्शन प्रार्थना म्हणून शौच-मुखमार्जन, तेल लावून अभ्यंगस्नान, केशभूषा, सुंदर पेहराव, प्रसाधन करून, आणि आभूषणांनी नटूनथटून झाल्यावर दैनंदिन कामासाठी तयारी होते.

देवांना भूपाळी, जात्यावर दळण कर ओव्या ,रामदासी लोक प्रभात फेरी यांच्या रेडिओ सारखी आधूनिक माध्यमे उपलब्ध झाल्यानंतर भक्ति गीते योग आणि सूर्य नमस्कार, सडा, दुध काढणे तुळशीचा पाणी, दारापुढे रांगोळी, दाराखिडक्यांवर तोरणे बांधून दिवसाच्या स्वागताची तयारी होते.

उपासना

खास सण आणि उत्सवाच्या वेळी भिंतीवर मंगल चिन्हेआणि देवदेवतांच्या आकृतीही चितारल्या जातात.

षोडषोपचार पूजा हा दिनचर्येतील एक महत्त्वाचा भाग असतो. देवघरातील देव्हाऱ्यात देवदेवतांच्या अनेक छोट्या मूर्ती आणि पवित्र चिन्हे यांची यथासांग पूजा केली जाते. पवित्र गंगाजलाने देवांना स्नान घातले जाते. त्यानंतर, दूध, दही, तूप, मध आणि साखा यांपासून सिद्ध केलेले पंचामृत देवांच्या अंगाला लावून त्यांना अभिषेक करतात. अभिकेषकानंतर देवांना स्वच्छ वस्त्राने पुसून त्यांना चंदन, हळद-पिंजर, अबीर-गुलाब लावण्यात येतो. त्यानंतर देवांवर अक्षत आणि फुले, तुळशी आणि बिल्वपत्रे वाहिली जातात. त्यानंतर धूप आणि शुद्ध तेलातुपातील दीप उजळला जातो. नंतर देवाला नैवेद्य अर्पण करतात आणि मग आरती होते. केव्हाकेव्हा झांज, टाळ, चिपळ्या , मृदंग, तंबोरा आदि संगीत वाद्यांची नादमधुर साथही आरतीला असते. आरतीनंतर मंत्रघोषात देवाला मंत्रपुष्पांजली होऊन पूजेची सांगता होते.

या षोडषोपचार पूजेच्या पूजासाहित्यात अभिषेक पात्र, तांब्यापळी, पंचपात्र यासारखी भांडी, करंडा, आरती-तबक, निरांजन, समई, कर्पूर पात्र (पंचारती), धूपपात्र, फुले ठेवण्यासाठी तबके किंवा परड्या आदि अनेक वस्तु असतात. त्यांचा घाट आकर्षक आणि जडणघडण कलात्मक असते.

संदर्भ