Jump to content

महाराष्ट्र विधान परिषद

Consell Legislatiu de Maharashtra (ca); महाराष्ट्र विधान परिषद (hi); మహారాష్ట్ర శాసనమండలి (te); মহারাষ্ট্র বিধান পরিষদ (bn); Maharashtra Legislative Council (en); マハーラーシュトラ州議会上院 (ja); המועצה המחוקקת של מהאראשטרה (he); महाराष्ट्र विधान परिषद (mr) upper house legislature of Indian state of Maharashtra (en); महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह (mr); בית עליון בבית מחוקקים מדינתי (he); భారత రాష్ట్రమైన మహారాష్ట్ర ఎగువసభ శాసనసభ (te) マハーラーシュトラ州上院 (ja)
महाराष्ट्र विधान परिषद 
महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविधान परिषद
ह्याचा भागमहाराष्ट्र विधानमंडळ
स्थान महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र भागमहाराष्ट्र
भाग
  • Member of Maharashtra Legislative Council
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

महाराष्ट्र विधान परिषद हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत ७८ सदस्य आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ६ घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात असून तेथे विधान परिषद अस्तित्वात आहेत. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.[] राज्यघटनेच्या कलम १६९ (१) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास भारतीय संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे राज्यघटनेने निश्चित केलेले नाही. कलम १७१ नुसार विधान परिषदेत किमान ४० सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत (विधानसभेच्या तुलनेत).[]

वधानपरिषदेबद्दल माहिती

घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सहा घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.

विधानपरिषदेची रचना

१९५६ च्या ७ व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या १/३ पेक्षा जास्त नसावी आणि ४० पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात ७८ इतकी सदस्य संख्या आहे.[] घटना कलम क्र. १७१/२ नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे ५/६ सदस्य निर्वाचित असतात तर १/६ सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात.

विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी

रचना :
१/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.
१/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
१/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
१/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.[]
१/६ राज्यपालाकडून सदस्य नामनिदेशित केले जातात, यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.

सदस्यांची पात्रता

  1. तो भारताचा नागरिक असावा.
  2. त्याच्या वयाची ३० वर्ष पूर्ण झालेली असावी.[]
  3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल

सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष इतका असतो.

विधानपरिषदेचा कार्यकाल

विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.[]

गणसंख्या

१/१० इतकी गणसंख्या असतो.

अधिवेशन

दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती

विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसऱ्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.[]

मतदारसंघ आणि सदस्य (७८)

महाराष्ट्र विधान परिषदेचे अलीकडील सदस्य खालीलप्रमाणे आहेत[]

विधानसभेच्या सदस्यांनी निवडलेले (३०)

      भाजप (१३)      शिवसेना (६)      राष्ट्रवादी (५)      काँग्रेस (४)      शेकाप (१)      रासप (१)

# सदस्य पक्ष कार्यकाळ
प्रवीण दरेकरभाजप८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
राम शिंदे भाजप८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
उमा खापरे भाजप८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
श्रीकांत भारतीय भाजप८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
प्रसाद लाड भाजप८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
रणजितसिंह मोहिते-पाटील भाजप१४-मे-२०२० १३-मे-२०२६
प्रवीण दटके भाजप१४-मे-२०२० १३-मे-२०२६
गोपीचंद पडळकरभाजप१४-मे-२०२० १३-मे-२०२६
रमेश कराडभाजप१४-मे-२०२० १३-मे-२०२६
१० निलय नाईक भाजप२८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
११ राम पाटील रातोळीकर भाजप२८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
१२ रमेश पाटील भाजप२८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
१३ विजय गिरकर भाजप२८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
१४ सचिन अहिर शिवसेना८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
१५ आमश्या पाडवी शिवसेना८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
१६ उद्धव ठाकरेशिवसेना१४-मे-२०२० १३-मे-२०२६
१७ नीलम गोऱ्हेशिवसेना१४-मे-२०२० १३-मे-२०२६
१८ अनिल परबशिवसेना२८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
१९ मनिषा कायंदे शिवसेना२८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
२० रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
२१ एकनाथ खडसेराष्ट्रवादी८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
२२ शशिकांत शिंदे राष्ट्रवादी१४-मे-२०२० १३-मे-२०२६
२३ अमोल मिटकरीराष्ट्रवादी१४-मे-२०२० १३-मे-२०२६
२४ बाबाजानी दुराणी राष्ट्रवादी२८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
२५ भाई जगतापकाँग्रेस८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
२६ राजेश राठोड काँग्रेस१४-मे-२०२० १३-मे-२०२६
२७ वजाहत अथर मिर्झा काँग्रेस२८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
२८ प्रज्ञा राजीव सातव काँग्रेस२३-नोव्हेंबर-२०२१ २७-जुलै-२०२४
२९ जयंत पाटील शेकाप२८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४
३० महादेव जानकररासप२८-जुलै-२०१८ २७-जुलै-२०२४

स्थानिक प्राधिकरणांच्या मतदारसंघातून निवडून आलेले (२२)

कळा:       भाजप (9)      शिवसेना (5)      काँग्रेस (3)      राष्ट्रवादी (2)      रिक्त (११)

# मतदारसंघ सदस्य पार्टी कार्यकाळ
मुंबई सुनील शिंदे शिवसेना२-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
मुंबई राज हंस सिंग भाजप२-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
धुळे-नंदुरबार अमरीश पटेल भाजप२-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
नागपूर चंद्रशेखर बावनकुळेभाजप२-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
अकोला-वाशिम-बुलढाणा वसंत खंडेलवाल भाजप२-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
कोल्हापूर सतेज पाटीलकाँग्रेस२-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
औरंगाबाद-जालना अंबादास दानवे शिवसेना३०-ऑगस्ट-२०१९ २९-ऑगस्ट-२०२५
उस्मानाबाद-लातूर-बीड सुरेश धस भाजप२२-जून-२०१८ २१-जून-२०२४
अमरावती प्रवीण पोटे भाजप२२-जून-२०१८ २१-जून-२०२४
१० वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली रामदास आंबटकर भाजप२२-जून-२०१८ २१-जून-२०२४
११ नाशिक नरेंद्र दराडे शिवसेना२२-जून-२०१८ २१-जून-२०२४
१२ परभणी-हिंगोली रिक्त
१३ रायगड-रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग रिक्त
१४ जळगाव रिक्त
१५ भंडारा-गोंदिया रिक्त
१६ पुणे रिक्त
१७ सांगली-सातारा रिक्त
१८ नांदेड रिक्त
१९ यवतमाळ रिक्त
२० ठाणे-पालघर रिक्त
२१ अहमदनगर रिक्त
२२ सोलापूर रिक्त

शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले (७)

      राष्ट्रवादी (१)      काँग्रेस (१)      अपक्ष (५)

# मतदारसंघ सदस्य पार्टी कार्यकाळ
पुणे जयंत आसगावकर काँग्रेस७-डिसेंबर-२०२० ६-डिसेंबर-२०२६
अमरावती किरण सरनाईक अपक्ष७-डिसेंबर-२०२० ६-डिसेंबर-२०२६
मुंबई कपिल वामन पाटील अपक्ष८-जुलै-२०१८ ७-जुलै-२०२४
नाशिक किशोर दराडे अपक्ष८-जुलै-२०१८ ७-जुलै-२०२४
औरंगाबाद सतिश चव्हाण राष्ट्रवादी८-डिसेंबर २०२० ७-डिसेंबर २०२६
कोकण ज्ञानेश्वर म्हात्रे भाजप ८-फेब्रुवारी-२०२३ ७-फेब्रुवारी-२०२९
नागपूर सुघाकर आडबाले कॉग्रेस ८-फेब्रुवारी-२०२३ ७-फेब्रुवारी-२०२९

पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले (७)

      राष्ट्रवादी (२)      काँग्रेस (२)      भाजप (१)      शिवसेना अपक्ष(१) (१)

# मतदारसंघ सदस्य पार्टी कार्यकाळ
नागपूर अभिजित वंजारी काँग्रेस७-डिसेंबर-२०२० ६-डिसेंबर-२०२६
औरंगाबाद विक्रम काळे राष्ट्रवादी८- फेब्रुवारी - २०२३ ०७ - फेब्रुवारी - २०२९

-

पुणे अरुण लाड राष्ट्रवादी७-डिसेंबर-२०२० ६-डिसेंबर-२०२६
मुंबई विलास पोतनीस शिवसेना८-जुलै-२०१८ ७-जुलै-२०२४
कोकण निरंजन डावखरे भाजप८-जुलै-२०१८ ७-जुलै-२०२४
अमरावती घनंजय लिंगाडे काँग्रेस८-फेब्रुवारी-२०२३ ७-फेब्रुवारी-२०२९
नाशिक सत्यजित तांबे अपक्ष८-फेब्रुवारी-२०२३ ७-फेब्रुवारी-२०२९

राज्यपाल नामनिर्देशित (१२)

      रिक्त (१२)

# सदस्य पार्टी कार्यकाळ
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
१० रिक्त
११ रिक्त
१२ रिक्त

बाह्य दुवे

  1. http://103.23.150.139/Home/Index
  2. https://www.mpscworld.com/bharatiy-nyayvyavashtebaddal-sampurn-mahiti/
  3. https://www.mpscworld.com/vidhanparishadebaddal-sampurn-mahiti/
  4. http://mls.org.in/pdf/Margdarshika.pdf

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ विधानमंडळ, महाराष्ट्र. "Maharashtra Legislature". mls.org.in. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  2. ^ विधानमंडळ, महाराष्ट्र. "Maharashtra Legislature". mls.org.in. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  4. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  5. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  6. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  7. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  8. ^ http://mls.org.in/pdf2021/winter/list-of-council-member.pdf साचा:Bare URL PDF