महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग ही महाराष्ट्र सरकारची एक स्वतंत्र एजन्सी आहे जी २६ एप्रिल १९९४ रोजी स्थापन झाली. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग हा महाराष्ट्र राज्यात ग्रामीण आणि शहरी स्थानिक संस्था निवडणुका घेते. हा निवडणूक आयोग राज्य विधानसभा, विधानपरिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा निवडणुका घेत नाही. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आयोजित करतो.भारतीय संविधानात भाग 9 अ अंतर्गत 243(K) आणि 243Z(A)मध्ये याची तरतूद आहे.
- महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त-
- दे.ना. चौधरी (१९९४ - १९९९)
- य.ल. राजवाडे (१९९९ - २००४)
- श्री नंदलाल (२००४ - २००९)
- श्रीमती नीला सत्यनारायण (२००९ - २०१४)
- श्री जोगेश्वर सहारिया (२०१४ - २०१९)
- यु.पी.एस. मदन (२०१९ - २०२४)
- एस.चोक्कालिंघम (२०२४- आता पर्यंत) (संदर्भ A.B.P.MAZA)
- पात्रता -
- भारताचाच नागरिक असावा.
- भारतीय प्रशासनाचा दीर्घ अनुभव असावा.
- राज्यपाल मते ती व्यक्ती योग्य असावी.
- दर्जा = राज्याच्या मुख्य सचिव /प्रधान सचिव प्रमाणे.
- राजीनामा राज्यपालकडे
- पदमुक्त राष्ट्रपतीद्वारे.